Accident : फॉर्च्युनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; भाऊबीजदिवशी पाच बहिणी भावाला मुकल्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जुन्नर : येथील नगर कल्याण रोडवर फॉर्च्युनर गाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. महेश विलीस घाडगे (रा.पिंपळगाव जोगा ता.जुन्नर) असे अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे. तर सिद्धेश तानाजी कोकणे असे जखमी युवकाचे नाव आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, ओतूर पोलिसांनी फॉर्च्युनरचे चालक शरद दिनकर गुंड (रा.वडगाव दर्या, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेतले आहे. याबाबतचा अधिक तपास ओतूर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नामदेव बांबळे करीत आहेत.

याबाबत दिपक दिनकर घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीमधून मिळालेली माहिती अशी की, २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास मोटर सायकल क्रमांक MH 14 DY 3041 या गाडीवरुन मृत महेश घाडगे आणि सिद्धेश कोकणे प्रवास करत होते. त्यावेळी नगर कल्याण मार्गावर पिंपळगाव जोगा गावाच्या हद्दीत एचपी पेट्रोलपंपाजवळ त्यांचा अपघात झाला. कल्याणच्या दिशेकडून आलेल्या भरधाव फॉर्च्यूनरने वेगात रोडच्या रॉंग साईडला येऊन महेश घाडगे यांच्या गाडीला धडक दिली.

हे वाचलं का?

अपघातानंतर आळेफटा येथील एका खाजगी रुग्णालयता दोघांना दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच महेश घाडगे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर सिद्धेश कोकणे यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, मृत महेश घाडगे एकुलता एक मुलगा असून त्यांना पाच बहिणी आहेत. भाऊबीजेदिवशीच पाच बहिणींच्या एकुलत्या एक भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT