अभिनेते दिलीप कुमार यांना रूग्णालयातून डिस्चार्ज
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात होतं. मात्र त्यांची प्रकृती ठिक असल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रूटीन चेकअपसाठी त्यांना रूग्णालयात दाखल केलं असल्याची माहिती दिलीप कुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांनी दिली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं […]
ADVERTISEMENT
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात होतं. मात्र त्यांची प्रकृती ठिक असल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रूटीन चेकअपसाठी त्यांना रूग्णालयात दाखल केलं असल्याची माहिती दिलीप कुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांनी दिली होती.
ADVERTISEMENT
दोन दिवसांपूर्वी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रूग्णालयात दाखल
हे वाचलं का?
दिलीप कुमार 98 वर्षांचे आहेत. सध्या देशात सर्वत्र कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. या संकटकाळात दिलीप कुमार यांनी आपला वाढदिवस देखील साजरा केला नाही. तर गेल्या वर्षी कोरोनामुळे दिलीप कुमार यांनी आपल्या भावाला देखील गमावलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT