Sidharth Shukla चा मृत्यू आणि शेवटच्या तासाभरातील संपूर्ण घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचं गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले. वास्तविक, सिद्धार्थ शुक्लाने बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं खाल्ली होती, पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठलाच नाही. त्याला रुग्णालयात नेल्यानंतर त्याचा मृत्यू (Death) झाला असल्याचं तेथील डॉक्टरांनी सांगितलं. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

दरम्यान, त्याच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर आज (शुक्रवार) त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ गुरुवारी सकाळी 3.30 वाजता उठला. त्यावेळी त्याने आपल्या आईला सांगितले की, त्याच्या छातीत दुखत आहे. आईने त्याला पाणी दिलं आणि झोपण्यास सांगितलं.

दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची आई रिटा या त्याला उठविण्यासाठी गेल्या तेव्हा तो उठलाच नाही. त्यामुळे जवळच राहणाऱ्या त्यांच्या मुलीला त्यांनी फोन करुन तात्काळ बोलावून घेतलं. त्यानंतर त्यांनी सगळ्यांनी मिळून सिद्धार्थला मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये नेले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे वाचलं का?

सिद्धार्थला सकाळी 9:40 वाजेच्या सुमारास रुग्णवाहिकेतून कूपर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. या वेळी त्याच्यासोबत बहीण, मेहुणा, चुलत भाऊ आणि तीन मित्र उपस्थित होते. 10:15 च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शरीरात जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत

ADVERTISEMENT

सिद्धार्थ शुक्लाच्या शरीराची तीन वेळा तपासणी करण्यात आली. त्याला अंतर्गत जखमेच्या खुणा नाहीत आणि त्याच्या मृतदेहाशी कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. असं प्राथमिक अहवालात म्हणण्यात आलं आहे. दरम्यान, सिद्धार्थच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम देखील केले गेले, जे तब्बल तीन तास सुरु होते.

ADVERTISEMENT

डॉक्टर शुक्रवारी सकाळी सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल जाहीर करतील. सिद्धार्थवर अंत्यसंस्कार शुक्रवारी सकाळी 10 ते 11 वाजेच्या सुमारास केले जातील. टीव्ही आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार सिद्धार्थच्या घरी उपस्थित आहेत.

Explainer : उत्तम शरीरयष्टी असलेल्या Siddarth Shukla चं निधन, तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं महत्वाचं कारण

‘शहनाज गिलची परिस्थिती अत्यंत वाईट’

सिद्धार्थ शुक्लाच्या प्रशिक्षकाने ‘आज तक’शी बोलताना सांगितलं की, सिद्धार्थची शहनाज गिल ही सिद्धार्थच्या आईसोबत त्यांच्या घरीच आहे. दोघींची अवस्था अत्यंत वाईट आहे. ट्रेनर म्हणाला, ‘मी सिद्धार्थच्या आईजवळ बसलो होतो. त्या म्हणाली की, ‘मला विश्वासच बसत नाही. त्यांना असे वाटते की, तो येईल आणि म्हणेल की आई मला हे द्या, आई मला ते दे.’

सिद्धार्थची आई मला असंही म्हणाली की, ‘माझा मुलगा तुझ्याशी खूप अटॅच होता ना. तुम्ही लोक दिवसातून किती वेळा बोलायचे. ही गोष्ट खरी आहे की, सिद्धार्थ मला झोपण्याचा आधी फोन करायचा आणि तो सकाळी उठल्याबरोबर माझ्याशी बोलायचा. त्याला त्याच्या आईची खूप काळजी होती. कारण सिद्धार्थ आईच्या सर्वात जवळचा होता. शहनाजही तिथे बसली आहे. शहनाज सिद्धार्थच्याच घरी आहे. ती सुद्धा अत्यंत हबकून गेली आहे. ती जास्त बोलत नव्हती. फक्त एकटक पाहत बसली आहे.’ अशी माहिती सिद्धार्थच्या ट्रेनरने दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT