अखुंदजादांच्या नेतृत्वात Taliban Government स्थापन, महिलांकडे कोणतीही जबाबदारी नाही

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सरकार स्थापन केलं आहे मुल्ला मोहम्मद अखुंदजादा यांच्या नेतृत्वात तालिबानने अंतरिम सरकार स्थापन केलं आहे. अखुंदजादा हे पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसणार आहेत. तर अब्दुल गनी बरदार यांना उपपंतप्रधान घोषित करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

खैरउल्लाह खैरख्वा यांच्याकडे माहिती प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. माव्लावी हक्कानी यांच्याकडे अंतर्गत व्यवहार मंत्रालय सोपवण्यात आलं आहे. अब्दुल हकीम यांना न्याय मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. शेर अब्बास यांच्या उप-परराष्ट्र मंत्रालय देण्यात आलं आहे. महत्त्वाची बाब ही महिलांकडे एकही खातं देण्यात आलेलं नाही.

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार स्थापन होणार अशा चर्चा सुरू होत्या. अखेर आता तालिबानने त्याला सुरूवात केली आहे. 20 वर्षांनी तालिबानने अफगाणिस्तानमध्ये पुन्हा सत्ता स्थापन करण्यात यश मिळवलं आहे. याआधी 1996 ते 2001 या कालावधीत अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता होती.

हे वाचलं का?

अमेरिकेवर 9/11 चा दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर अमेरिकेने प्रतिहल्ला करून तालिबान्यांना सत्तेवरून काढलं होतं. अमेरिकेच्या सैन्याने 20 वर्षे अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकला होता. मात्र 2018 पासून अमेरिकेने अफगाणिस्तान सोडण्यास सुरूवात केली होती. 31 ऑगस्ट 2021 ला अमेरिकेतला शेवटचा सैनिक अफगाणिस्तानमधून रवाना झाला. तालिबानला अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्यासाठी काही महिने लागतील असं वाटलं होतं मात्र अवघ्या काही दिवसांमध्येच तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. त्यानंतर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून पळाले.

ADVERTISEMENT

कसं आहे तालिबानचं नवं मंत्रिमंडळ

ADVERTISEMENT

मुल्ला मोहम्मद अखुंद-पंतप्रधान

मुल्ला गनी बरादर-उपपंतप्रधान

मुल्ला अबदस सलाम-उपपंतप्रधान

सिराजुद्दीन हक्कानी-गृहमंत्री

मुल्ला याकूब-संरक्षण मंत्री

खैरूल्लाह खैरख्वा-माहिती प्रसारण मंत्री

जबिउल्लाह मुजाहिद- माहिती प्रसारण उपमंत्री

शेर अब्बास-उप विदेश मंत्री

अब्दुल हकीम-न्याय मंत्री

हेदयातुल्लाह बद्री-अर्थमंत्री

शेख नुरूल्लाह-शिक्षण मंत्री

नूर मोहम्मद साकिब-हज आणि धार्मिक मंत्री

नुरूल्लाह नुरी-जनजातीय मंत्री

मोहम्मद युनुस अखुंदजादा-ग्रामीण आणि पुनर्विकास मंत्री

मोहम्मद एसा अखुंद-पेट्रोलियम मंत्री

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT