मला काही तेवढाच उद्योग नाही; अजित पवारांचा सकाळीच चढला पारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या ईडीचीच चर्चा सुरू आहे. सहकारी साखर कारखानाप्रकरणी ईडीने धाडी टाकल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांचा चांगलाच पारा चढला आहे. ‘मला सांगा, धाडी कुठे पडल्या’, असा अजित पवारांनी केला.

ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. ईडीच्या कारवाईप्रकरणी बोलताना जित पवारांनी नाराजी व्यक्त केली. ‘मला सर्व चॅनेल्स आणि मीडियाला स्पष्ट सूचना करायची आहे. मी काल पाहिलं की, अजित पवार यांचा दुरान्वये संबध नसताना बारामतीमधील एका जमिनीबद्दल उच्च न्यायालयामध्ये केस दाखल, अशी बातमी पाहण्यास मिळाली. काही संबध नसताना अशा धादांत खोट्या बातम्या समोर आणल्या जात आहे’, अशा शब्दात अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.

‘यापूर्वी देखील दोन-तीन बातम्या अशाच आणल्या गेल्या आहेत. यामुळे लोकांमधील मीडियाबद्दल विश्वास उडत चालला आहे. धाडी पडल्याच्या सांगितलं गेलं. कुठे धाडी पडल्या? मला सांगा, कुठल्या सहकारी बँकेत धाड पडली? याबद्दल मी सहकार आयुक्त कवडे यांनाही विचारलं’, असं अजित पवार म्हणाले.

हे वाचलं का?

त्यावर तुम्ही त्या विरोधात कायदेशीर मार्गाने जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, ‘मला काही तेवढाच उद्योग नाही. मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो. याचाच मागे कुठे कायदेशीर कारवाईसाठी लागता. वकील द्या, त्यांच्या मागे जा. एवढेच धंदे आहेत का आमच्या मागे? या सर्व गोष्टींची नोंद सर्व संपादकांनी घ्यावी ही माझी कळकळीची विनंती’, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

ADVERTISEMENT

शाळा सुरू करण्याबद्दल दोन मतप्रवाह…

ADVERTISEMENT

शाळा सुरू करण्याच्या मुद्द्यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. ‘शाळा सुरू करण्याबद्दल सध्या दोन मतप्रवाह दिसत आहेत. यामध्ये काहीजण म्हणतात दिवाळीनंतर, तर दुसर्‍या बाजूला काहीजण म्हणतात जिथे शून्य टक्के रुग्ण संख्या आहे, तिथे शाळा सुरू कराव्यात. तसेच राज्यातील शाळा केव्हा सुरू करायच्या. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेतील’, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT