अजित पवारांनी शरद पवारांसमोरच पिळले नेत्यांचे कान; म्हणाले, ‘कुणाची बिनपाण्याने करायची…’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी पक्षाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील नेत्यांचे कान पिळले. भाषणं सुंदर करता, पण तुमच्या जिल्ह्यात तुमच्याशिवाय कुणीच निवडून येत नाही, असं म्हणत अजित पवारांनी खडेबोल सुनावले. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, “खूप जणांनी खूप काही सांगितलं. अनेक सहकारी सांगताना मी बारकाईने ऐकत होतो. […]
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी पक्षाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील नेत्यांचे कान पिळले. भाषणं सुंदर करता, पण तुमच्या जिल्ह्यात तुमच्याशिवाय कुणीच निवडून येत नाही, असं म्हणत अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
ADVERTISEMENT
मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, “खूप जणांनी खूप काही सांगितलं. अनेक सहकारी सांगताना मी बारकाईने ऐकत होतो. साहेब (शरद पवार) पण ऐकत होते. माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की, साहेब आता 83व्या वर्षात पदार्पण करताहेत. आपण सगळे सांगतो असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. प्रत्येक नेत्याने आपल्या जिल्ह्यातून आमदार करताना स्वतःबरोबर काही आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करा. आपण राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर जाऊ.”
तुमच्याशिवाय कुणीच निवडून येत नाही -अजित पवार
“मी बोललोय… याला अपवाद फक्त नाशिक आणि बीड जिल्हा आहे आणि दिलीपराव पुणे जिल्ह्याचे असल्यामुळे पुणे जिल्हा आहे. इतरांनी पण तुम्ही इतकं सुंदर भाषण… सगळ्यांना मार्गदर्शन करता. परंतु तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यातून तुमच्याशिवाय कुणी निवडूनच येत नाही”, असे बोल अजित पवारांनी नेत्यांना सुनावले.
हे वाचलं का?
‘माझा मुडदा पाडण्याचा विचार होता, पण…’, जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदेंसोबतच संभाषणच सांगितलं
‘माझ्यासारखं काम करा’, अजित पवारांनी काय सांगितलं?
“मी आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने कुणाची बिनपाण्याने करायची असं ठरवलं नव्हतं, पण खरं ते बोललं पाहिजे. मी खरं बोलणारा कार्यकर्ता म्हणून माझी महाराष्ट्रात ओळख आहे. त्याला मी काय करू. बाबानो, आपण मार्गदर्शन करा. मी ज्यावेळस मार्गदर्शन करतो, त्यावेळस माझ्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त ताकद राष्ट्रवादीला कशी मिळेल, यासाठी मी, दिलीपराव आणि सगळेजण जिवाचं रान करतो. तशाच पद्धतीने वेगवेगळ्या जिल्ह्यात प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी करावं.”
ADVERTISEMENT
भगतसिंह कोश्यारींचा अमित शाहांकडे माफीनामा? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानावर म्हणाले…
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीबद्दल शिंदे गट जी भीती बोलून दाखवत होता, त्याची अजित पवारांनी घोषणा केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांचंही टेन्शन वाढलं.@AjitPawarSpeaks#AjitPawar #EknathShinde #SharadPawar #UddhavThackeray pic.twitter.com/qHhkVnvt4j
— Mumbai Tak (@mumbaitak) December 12, 2022
अजित पवारांनी नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना काय दिली शपथ?
“एक शपथ घ्या. आपापल्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही मतभेद असतील, ते संपून टाकायचे. मग त्यासाठी एखाद्या नेत्याला दोन पावलं मागं यावं लागलं, तरी चालेल. काही बिघडत नाही. पवार साहेबांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर बेरजेचं राजकारण केलेलं आहे. हे बेरजेचं राजकारण करत असताना आपल्याला आपला पक्ष राज्यात पहिल्या क्रमांकावर न्यायचा म्हटलं तर कुठेतरी काहीतरी आपल्या पक्षात आपल्या घरात काहीतरी पुढे मागे करावं लागणार आहे. याची खूणगाठ बांधावी”, असं आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT