सरकार आपलं तरीही आपल्याच मंत्र्यांवर गुन्हे कसे? कॅबिनेटमध्ये काँग्रेस गृहमंत्र्यांवर नाराज

मुस्तफा शेख

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील बेबनाव प्रत्येक दिवशी नव्याने समोर येताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज कॅबिनेट बैठकीत राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून सर्व निर्बंध रद्द उठवण्याची घोषणा केली. याच बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांवर काँग्रेसच्या मंत्र्यांनी नाराजी बोलून दाखवल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात काँग्रेस मंत्री अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांनी हातात तलवार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील बेबनाव प्रत्येक दिवशी नव्याने समोर येताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज कॅबिनेट बैठकीत राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून सर्व निर्बंध रद्द उठवण्याची घोषणा केली. याच बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांवर काँग्रेसच्या मंत्र्यांनी नाराजी बोलून दाखवल्याचं कळतंय.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात काँग्रेस मंत्री अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांनी हातात तलवार घेऊन फोटो काढल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचे पडसाद आजच्या बैठकीत उमटलेले पहायला मिळाले.

महाराष्ट्र अनलॉक! राज्यातले सर्व कोरोना निर्बंध उठवले, जितेंद्र आव्हाडांनी दिली माहिती

जाहीर कार्यक्रमात तलवार घेऊन उंचावल्याप्रकरणी अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांच्याविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. भाजप नेते मोहीत कंबोज यांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली. सरकार आपले असूनही आपल्याच मंत्र्यांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हे दाखल कसे केले जात आहेत, असा सवाल मंत्र्यांनी केला. या नाराजीनंतर आता या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यासाठी मुख्य सचिवांची समिती नेमली जाणार आहे. कोणत्या कारणांमुळे गुन्हे दाखल झाले, याचा अहवाल ही समिती सादर करेल, असे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आल्याचं कळतंय.

हे वाचलं का?

    follow whatsapp