अमृता फडणवीस म्हणाल्या… ‘ए भाई, तू कोण पण असशील!’
मुंबई: ‘ए भाई तू जो कोण असशील- माझ्यावर बोट उचलायचं न्हाय!’ अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अमृता फडणवीस यांनी अशाप्रकारचं ट्विट करताना केलेला एकेरी उल्लेख यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसचे आमदार भाई जगताप एका मराठी वृतवाहिनीशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘ए भाई तू जो कोण असशील- माझ्यावर बोट उचलायचं न्हाय!’ अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अमृता फडणवीस यांनी अशाप्रकारचं ट्विट करताना केलेला एकेरी उल्लेख यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
काँग्रेसचे आमदार भाई जगताप एका मराठी वृतवाहिनीशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री असताना पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कोणत्या आधारावर वर्ग केली होती? त्यावेळी यांनी राजीनामा दिला होता का? असा सवाल उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस ह्या चांगल्याच आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे.

याबाबत अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. ए भाई, तू जो कोण असशील माझ्या वर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक‘ला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय! अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला. सध्या अमृता फडणवीस यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.









