अंधेरी पोटनिवडणूक : माघार घेतलेल्या भाजपचा ऋतुजा लटकेंविरोधात प्रचार?
अंधेरी पोटनिवडणुकीच्या सुरुवातीलाच बरंच राजकारण बघायला मिळालं. भाजपनं उमेदवार दिला. राज ठाकरे, शरद पवारांच्या आवाहननंतर निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं गेलं. पण, व्हायरल झालेल्या एका कथा ऑडिओ क्लिपमुळे आणि त्यानंतर समोर आलेल्या एका ट्विटने भाजपचा ऋतुजा लटकेंविरोधात प्रचार सुरूये का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा […]
ADVERTISEMENT
अंधेरी पोटनिवडणुकीच्या सुरुवातीलाच बरंच राजकारण बघायला मिळालं. भाजपनं उमेदवार दिला. राज ठाकरे, शरद पवारांच्या आवाहननंतर निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं गेलं. पण, व्हायरल झालेल्या एका कथा ऑडिओ क्लिपमुळे आणि त्यानंतर समोर आलेल्या एका ट्विटने भाजपचा ऋतुजा लटकेंविरोधात प्रचार सुरूये का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
ADVERTISEMENT
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकारणावर गेल्या आठवड्यात पडदा पडला. भाजपनं निवडणुकीतून माघार घेत मुरजी पटेल यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत असलेल्या ऋतुजा लटकेंचा विजय आता जवळपास निश्चित झालाय, असं समजलं गेलं.
‘नोटा’ला मतदान करण्याचं आवाहन करणारी कथित ऑडिओ क्लिप
भाजपनं निवडणुकीतून माघार घेतली, तरीही ऋतुजा लटकेंनी प्रचार थांबवला नाही. यामागची कारणांची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. ती चर्चा अशी की, भाजपनं माघार घेतली असली, तरी ती मतं ऋतुजा लटकेंना मिळणार नाही, याची काळजी घ्यायची. यातच एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.
हे वाचलं का?
या व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे एक शंका उपस्थित केली गेली की, आता नोटाचं आव्हान ऋतुजा लटकेंसमोर समोर उभं करण्यात आलंय का? कारण या ऑडिओक्लिपमधून नोटा बटणावर क्लिक करुन जास्तीत जास्त नाराजी व्यक्त करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
तर दुसरीकडे कथित ऑडिओ क्लिपमध्ये केलेल्या आवाहनानुसार मुरजी पटेल यांना माघारी घ्यायला लागल्यामुळे भाजप नेत्यांविरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी नोटा बटणावर मतदान करण्याचं आवाहन केलं गेलंय. कारण, यात ज्यांना काकांना (मुरजी पटेल) मतदान करायचं त्यांनी मतदान करावं असं आवाहन करण्यात आलंय.
ADVERTISEMENT
ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, ‘ही ऑडिओ क्लिप भाजपकडून करण्यात आलेली नाही.’ तर दुसरीकडे काँग्रेसनं ही ऑडिओ क्लिप ट्विट करत ‘कट सम्राट, गट सम्राट किती षडयंत्र रचणार’, अशी टीका केली.
ADVERTISEMENT
भाजपचं ट्विट, चंद्रशेखर बावनकुळेंची ‘ती’ भूमिका
या कथित ऑडिओ क्लिपवरून वादविवाद सुरू झालेले असतानाच महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरून एक ट्विट करण्यात आलं. या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिसत असलेलं कार्टून शेअर करण्यात आलंय. त्यावर ‘उद्धव सेनेला मत म्हणजे काँग्रेसला मत’, असं म्हटलं आहे.
उद्धवसेनेला मत म्हणजे काँग्रेस ला मत! pic.twitter.com/4umFRLbd1g
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 20, 2022
याच ट्विटमुळे भाजपच्या पोटनिवडणुकीतून माघार आणि ऋतुजा लटकेंना पाठिंबा देत असल्याच्या भूमिकेवर शंका उपस्थित होऊ लागलीये. भाजपच्या माघारीनंतरही ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’च्या उमेदवार ऋतुजा लटके अंधेरी पोटनिवडणुकीचा प्रचार करत आहेत. त्यामागे हेच कारण असल्याचं बोललं जात आहे. भाजपनं एकीकडे ऋतुजा लटकेंना पाठिंबा दिलेला असताना, दुसरीकडे उद्धव सेनेला मत देऊ नका, म्हणत ऋतुजा लटकेंना मतदान न करण्याचा प्रचार सुरू केलाय का? या प्रश्नाने डोकं वर काढलंय.
उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसला मत pic.twitter.com/VUccuGNnTd
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) October 15, 2022
उद्धव ठाकरेंना मत म्हणजे काँग्रेसला मत अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुरजी पटेल निवडणुकीच्या रिंगणात असताना घेतली होती. त्यामुळे भाजपकडून निवडणुकीतून माघार घेतलेली असताना उद्धव ठाकरे पर्यायाने ऋतुजा लटकेंना दिलेलं मत म्हणजे काँग्रेसला जाणार मत, अशी भूमिका भाजपकडून मतदानाची तारीख जवळ असताना घेतली गेलीये.
शिवसेना उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे काँग्रेसला मत
शिवसेना उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला मत– भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष @cbawankule जी pic.twitter.com/6i6gYh8F2e
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) October 14, 2022
पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच ऋतुजा लटकेंविरोधात भूमिका भाजपच्या सोशल मीडियावरून मांडण्यात आलीये. त्यामुळेच भाजपचा गुपचूप ऋतुजा लटकेंच्या विरोधात प्रचार सुरू असल्याच्या शंकेला वाव मिळू लागला आहे. तसा सूर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियामधून उमटू लागला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT