राजीनाम्याच्या प्रश्नावर अनिल देशमुख यांचं सूचक मौन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिल्ली दौरा करून शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर जेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांना तुमच्या राजीनाम्याची चर्चा आहे असं विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी काहीही प्रतिक्रिया न देता थेट गाडीत बसून निघून जाणंच पसंत केलं.

ADVERTISEMENT

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे-अनिल देशमुख

आणखी काय म्हणाले अनिल देशमुख?

हे वाचलं का?

आज सकाळी मी दिल्लीत आलो होतो, शरद पवार यांच्यासोबत मी चर्चा केली. विदर्भातल्या काही प्रकल्पांबाबत मी त्यांच्याशी चर्चा केली. इंटरनॅशनल कंपन्या विदर्भातही आल्या पाहिजेत अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली. या कंपन्यांच्या काही अडचणी होत्या त्याबाबत मी शरद पवार यांच्याशी चर्चा केली आता औद्योगिक विभागाशी चर्चा करून त्या कंपन्यांचे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.

याशिवाय मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटकं मिळाली त्या स्कॉर्पिओ प्रकरणी NIA तपास करत आहे. तर मनसुख हिरेन हत्येप्रकरणी महाराष्ट्र एटीएस तपास करत आहे असं त्यांनी सांगितलं. राज्य शासनातर्फे आम्ही NIA ला तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत. या प्रकरणाची तपासणी योग्य प्रकारे झाली पाहिजे. तसंच या प्रकरणात जे कुणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

सचिन वाझे ठाकरे सरकारचे वसुली अधिकारी- देवेंद्र फडणवीस

ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ तेव्हा उडाली जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अँटेलिया प्रकरणात सचिन वाझेंवर आरोप केले. तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणातही विमला हिरेन यांचा जबाब वाचून दाखवत सचिन वाझेंवर आरोप केले. या सगळ्या प्रकरणाची जशी चर्चा झाली तशीच चर्चा अनिल देशमुख यांच्या काहीश्या मवाळ भूमिकेचीही झाली. त्यामुळे अधिवेशन संपल्यावर अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार का? या चर्चा रंगल्या होत्या. आज दिल्लीत जेव्हा अनिल देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यानंतरही त्यांना याबाबत विचारण्यात आलं मात्र त्यांनी काहीही प्रतिक्रिया न देता निघून जाणंच पसंत केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT