आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : आरोपपत्र दाखल करण्यासाठी का हवाय वेळ?; एनसीबीने दिली कारणांची यादी

विद्या

महाराष्ट्रासह देशभर गाजलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास एनसीबीच्या एसआयटी समितीकडून केला जात असून, एनसीबीने पुन्हा एकदा न्यायालयाकडे आरोपपत्र दाखल करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ मागितला आहे. एनसीबीने वेळ मागत असताना न्यायालयासमोर कारणांची मोठी यादीच ठेवली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबी जप्त केलेल्या पदार्थांचे १७ नमुने पुण्यातील राष्ट्रीय न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे (Central Forensic Science Laboratory) […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रासह देशभर गाजलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास एनसीबीच्या एसआयटी समितीकडून केला जात असून, एनसीबीने पुन्हा एकदा न्यायालयाकडे आरोपपत्र दाखल करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ मागितला आहे. एनसीबीने वेळ मागत असताना न्यायालयासमोर कारणांची मोठी यादीच ठेवली आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबी जप्त केलेल्या पदार्थांचे १७ नमुने पुण्यातील राष्ट्रीय न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे (Central Forensic Science Laboratory) तपासणीसाठी पाठवले होते. हे सर्व घटक एनडीपीएस कायद्याच्या कक्षेत येणारी अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ असल्याचं सीएफएसएलने म्हटलेलं आहे. आतापर्यंत ६९ जबाब नोंदवण्यात आले असून, १० स्वतंत्र साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे. अजून ४ साक्षीदारांची चौकशी बाकी आहे. आतापर्यंत १९ संशयितांची साक्ष नोंदवण्यात आली असल्याची माहिती एनसीबीच्या एसआयटीने न्यायालयात दिली आहे.

आर्यन खान प्रकरणातील आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनसीबीच्या एसआयटीने न्यायालयात काही कारणं सांगितली आहेत, ती अशी…

आर्यन खान प्रकरणातील पंच असलेल्या के.पी. गोसावींवर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर तो चर्चेत आला होता. याच के.पी. गोसावीसंदर्भात एनसीबीने न्यायालयात माहिती दिली आहे. “गोसावीचा ऐच्छिक जबाब आणि रेकॉर्डिंग पूर्ण झालेलं नाही. त्याला इतर प्रकरणात पुणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावलेली आहे. यासंदर्भात न्यायालयाकडे तीन वेळा विनंती केली, मात्र न्यायालयाने विनंती मान्य केलेली नाही. गोसावीचा जबाब नोंदवण्याच्या प्रतिक्षेत आहोत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह काही आरोपीकडून जप्त केलेल्या वस्तूंचा पंचनामा करताना गोसावी हा मुख्य पंच साक्षीदार आहे, असं एसआयटीचं म्हणणं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp