Mumbai Rains: ‘नेमेची येतो पावसाळा…पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा’, आशिष शेलारांची शिवसेनेवर घणाघाती टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मान्सूनच्या (Monsoon) पहिल्या पावसातच (Mumbai Rains) मुंबई महापालिकेने (BMC) नालेसफाईचे केलेले दावे फोल ठरले असून मुंबईची (Mumbai) दाणादाण उडाली. यावरुन भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे.

ADVERTISEMENT

यावेळी आमदार आशिष शेलार म्हणाले की, ‘मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलं आहे. घरात पाणी घुसू लागलं आहे. नालेसफाई कधी 107 टक्के तर कधी 104 टक्के… दाव्यांचे आकडे मोठे-मोठ्याने ‘वाझे’..

‘पहिल्या पावसातच ‘कटकमिशन’चे सगळे व्यवहार उघडे. मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा… नेमेची येतो पावसाळा… पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा’, अशा काव्यात्मक स्वरुपात आशिष शेलार यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

हे वाचलं का?

Monsoon 2021 : महाराष्ट्रासाठी पुढचे ५ दिवस धोक्याचे, IMD कडून अलर्ट जाहीर

पाहा आशिष शेलार यांनी नेमके काय आरोप केले आहेत:

ADVERTISEMENT

‘मुंबईत सुमारे 252.74 किमी लांबीचे एकूण 170 मोठे नाले तर 438.9 किमी लांबीचे छोटे नाले आहेत. पेटीका नलिका 621.46 किमी. रस्त्याच्या बाजूची उघडी गटारे 1991.69 किमी. जाळया संख्या 1,90,488, भूमिगत कमानी/नलिका पर्जन्य जलवाहिन्या 565.41 किमी असून यांच्या साफसफाईसाठी दरवर्षी सुमारे 150 कोटींपेक्षा जास्त निधी दिला जातो.’

ADVERTISEMENT

‘दरवर्षी नालेसफाईच्या गाळाचे मोठमोठे आकडे दिले जातात पण किती गाळ काढला त्याच्या वजनाच्या पावत्या, कुठे टाकला त्याचे सीसीटीव्ही फुटेज असे कोणतेही पुरावे मागूनही कधीच दिले जात नाहीत.’

‘आम्ही गेली अनेक वर्षे नालेसफाईच्या कामातील फोलपणा प्रत्यक्ष जागेवर जाऊन उघड करतो आहोत. पण कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी पक्ष करतो. कंत्राटदार, अधिकारी आणि सत्ताधारी यांची अभद्र युती महापालिकेत असून त्यांनी गेल्या पाच वर्षात नालेसफाईच्या नावावर सुमारे 1 हजार कोटींचा घोटाळा करुन तिजोरीवर डल्ला मारला आहे.’

‘यावेळी महापालिकेने 107 टक्के तर कालच 104 टक्के नालेसफाई झाली असा दावा केला होता आणि आज (9 जून) सकाळी पडलेल्या पावसाने हे सगळे दावे वाहून नेले आहेत.’ अशा शब्दात आमदार आशिष शेलार यांनी सत्ताधारी पक्षाचा समाचार घेतला आहे.

Monsoon in Mumbai : पहिल्याच फटक्यात Mumbai Local ला ब्रेक

दरम्यान दोनच दिवसापूर्वी आशिष शेलार यांनी गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत नालेसफाईचा दौरा करुन न झालेल्या कामांवरुन देखील मुंबई महापालिकेच्या काराभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT