अबुधाबी विमानतळावर ड्रोन हल्ला?; तेल टँकरच्या स्फोटात 3 ठार, भारतीयांचाही समावेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईतील अबुधाबी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. विमानतळावर दोन स्फोट झाले. या स्फोटात 3 लोकांचा मृत्यू झाला असून, भारतीयांचाही समावेश आहे. ड्रोनच्या मदतीने हे स्फोट घडवून आणण्यात आल्याचा दावा युएईतील अधिकाऱ्यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

अबुधाबी पोलिसांनी वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार औदयोगिक क्षेत्र असलेल्या मुफासात तेलाच्या तीन टँकरचा स्फोट झाला. ADNOC या तेल कंपनीचे येथे तेल साठे आहेत. या ठिकाणी झालेल्या स्फोटामुळे अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी आग लागली.

अबुधाबी पोलिसांच्या माहितीप्रमाणे या स्फोटात जवळपास तीन लोक ठार झाले असून, 6 जण जखमी झाले आहेत. मृतांची ओळख पटवण्यात आली असून, मृतांमध्ये दोन व्यक्ती भारतीय असून, एक पाकिस्तानी आहे. दरम्यान, जखमींची ओळख अजून करण्यात आलेली नाही. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

हे वाचलं का?

पोलिसांकडून तपास सुरू होण्यापूर्वीच येमेनच्या हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेनं निवेदन प्रसिद्ध करून युएईवर हल्ले सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. हुथी बंडखोरांनी यापूर्वी अनेकवेळा हल्ले केल्याचा दावा केला होता. मात्र, अमिरातीतील अधिकाऱ्यांनी दावा फेटाळून लावला होता.

ड्रोनने हल्ला केल्याचा अंदाज

ADVERTISEMENT

पोलिसांनी स्थानिक वृत्तसंस्था WAM ला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, “प्राथमिक पाहणीत छोट्या विमानाचे काही भाग सापडले आहेत. हे छोटे भाग ड्रोनचेही असू शकतात. दोन्ही ठिकाणांवर ड्रोनद्वारे हल्ला केला गेला आणि आग लागली असावी”, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

यापूर्वीही करण्यात आलेत हल्ले

2019 पासून येमेनमधील युएई लष्करी जवानांची संख्या कमी झाली आहे. मात्र, येमेन लष्कराच्या माध्यमातून प्राबल्य कायम आहे. त्यामुळे येमेनमधील हुथी बंडखोरांकडून सातत्याने सौदी अरेबियातील विमानतळांना लक्ष्य केलं जात आहे. गेल्या वर्षीही दक्षिण सौदी अरेबियातील एका विमानतळावर ड्रोनने हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यामुळे एका विमानाला आग लागली होती. ऑगस्ट 2021 मध्येही हुथी बंडखोरांनी आणखी एका विमानतळावर हल्ला केला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT