बीड: जमिनीच्या वादातून आरोपीने थेट 100 मंदिरं उडवून देण्याची दिली धमकी?
रोहिदास हतागळे, बीड देवस्थानाच्या जमिनी लुटण्याचा प्रकाराने गाजत असणाऱ्या बीड जिल्ह्यात देवस्थानाला आलेल्या धमकीच्या पत्रानं एकच खळबळ उडाली होती. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या, परळी वैद्यनाथ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या योगेश्वरी देवीच्या विश्वस्तांना काही दिवसांपूर्वी धमकीचे पत्र आलं होतं. ज्यामध्ये अशी धमकी देण्यात आली होती की, 50 लाख रुपये द्या अन्यथा, मंदिर आरडीएक्सने उडवून टाकू. […]
ADVERTISEMENT
रोहिदास हतागळे, बीड
ADVERTISEMENT
देवस्थानाच्या जमिनी लुटण्याचा प्रकाराने गाजत असणाऱ्या बीड जिल्ह्यात देवस्थानाला आलेल्या धमकीच्या पत्रानं एकच खळबळ उडाली होती. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या, परळी वैद्यनाथ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या योगेश्वरी देवीच्या विश्वस्तांना काही दिवसांपूर्वी धमकीचे पत्र आलं होतं. ज्यामध्ये अशी धमकी देण्यात आली होती की, 50 लाख रुपये द्या अन्यथा, मंदिर आरडीएक्सने उडवून टाकू.
दरम्यान, पत्रामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान, आता या प्रकरणात दोन्ही पत्रावर नाव असणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे पत्र जमिनीच्या वादातून पाठवलं असल्याचा जबाब, धमकीच्या पत्रावर नाव असणाऱ्या दोघांनी पोलिसात दिला आहे.
हे वाचलं का?
एवढेच नाही तर संबंधित आरोपीने हे दोनच नाही तर जवळपास शंभर पत्र असे विविध देवस्थानाला दिले असल्याचा जबाब त्यांनी दिला. दरम्यान जमिनीच्या वादातून प्रतिवादी यांनी हा प्रकार केला असल्याचं दोघांनी सांगितलं आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास आम्ही करत आहोत. अशी माहिती पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी दिली आहे. दरम्यान, आरोपींनी ज्याचा उल्लेख केला तो प्रतिवादी नेमका कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं होतं?
ADVERTISEMENT
भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर बॉम्ब लावून उडवून देऊ अशी धमकी मिळाल्याने परळी शहरात एकच खळबळ उडाली होती. शुक्रवार (26 नोव्हेंबर) रोजी वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त यांच्या नावाने धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर (27 नोव्हेंबर) रोजी अंबाजोगाई येथे योगेश्वरी देवल कमिटीच्या मुख्य विश्वस्तांच्या नावे देखील असंच पत्र पाठवण्यात आलं होतं.
पत्रात नेमकी काय देण्यात आली होती धमकी?
‘आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया आहे. मला खाजगी व महत्वाच्या कामासाठी 50 लाख रुपयांची गरज आहे.’
‘हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी योगेश्वरी मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन.’ असे धमकी देणारं पत्र विविध मंदिरांना पाठविण्यात आलं होतं.
अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला हे पत्र प्राप्त होताच देवल कमिटीचे सचिव अॅड. शरद लोमटे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात आरोपी प्रभाकर नामदेव पुंड (रा.पिंपळगाव,जि.नांदेड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी मंदिराला भेट देऊन संपूर्ण मंदिराची पाहणी देखील केली होती.
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर परळी येथे आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी राज्य व परराज्यातून लाखो भाविक येतात. संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली होती.
बीड: ’50 लाख रुपये द्या, अन्यथा मंदिर आरडीएक्सने उडवू’, पुन्हा एक धमकीचं पत्र
मार्च 2020 पासून हे मंदिर कोरोना बंद ठेवण्यात आले होते. महिनाभरापूर्वी मंदिरे उघडण्याचा निर्णय झाल्याने हे मंदिर भाविकांसाठी खुले झाले. यामुळे आता भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT