बेळगाव: महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाईफेक, सीमाभागात तणावपूर्ण वातावरण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दीपक सूर्यवंशी, बेळगाव: बेळगावात सोमवार (13 डिसेंबर) कर्नाटक राज्याच्या अधिवेशन भरत असताना त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती मार्फत महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान कन्नड वैदिक संघटनेच्या 4 कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र मध्यवर्ती एककीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर भ्याड हल्ला करत शाई फेक केली. यानंतर संतापलेल्या मराठी भाषिकांनी त्याची तक्रार नोंदवण्यासाठी जात असताना पोलिसांनी पुन्हा एकदा दडपशाहीचा मार्ग अवलंबून समितीच्या कार्यकर्त्यांना थांबवलं.

ADVERTISEMENT

या सगळ्या प्रकारामुळे बेळगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान काही ठिकाणी कार्यकर्ते व पोलिसात झटापट झाल्याचे पाहायला मिळाले.

गेले कित्येक वर्ष बेळगावसह 865 गावांचा सीमाप्रश्न सुप्रीम कोर्टात दाखल असून कर्नाटक सरकार बेळगावातील मराठी भाषिकांना डिवचण्याचा साठीच जाणून-बुजून अधिवेशन बेळगावमध्ये घेत असल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती मार्फत महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

हे वाचलं का?

यादरम्यान कन्नड वैदीक संघटनेच्या 4 कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र मध्यवर्ती एककीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर भ्याड हल्ला करत शाई फेकली.

यानंतर भडकलेल्या मराठी भाषिकांनी त्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी यावेळी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचं काहीही ऐकून घेतलं नाही.

ADVERTISEMENT

कर्नाटक राज्याचं अधिवेशन बेळगावमध्ये भरते याला प्रत्युत्तर म्हणुन महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

ADVERTISEMENT

परंतु सकाळपासून तणावपूर्ण वातावरणात अधिकाऱ्यांकडून महामेळावा करू नये अशा पद्धतीचं आवाहन करण्यात येत होतं. मात्र, यादरम्यान कन्नड म्युझिक संघटनेच्या दोघांनी अचानक समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाही फेकली.

यानंतर मेळाव्याच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेल्या अनेक मराठी कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत होते. मराठी भाषिक आणि कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मोठी झटापटही झाली.

पोलिसांनी याठिकाणी लाठीमार करत महामेळावा बंद पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मराठी भाषिक आक्रमक बनत मोर्चाने घोषणा देत कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला.

कित्येक वर्ष मराठी भाषकांची गळचेपी कर्नाटक सरकारकडून होत असल्याच्या निषेधार्थ आजच्या या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सुरुवातीपासूनच कर्नाटकचे दडपशाही सुरू होती.

‘बेळगाव तर सोडा मुंबईलाच केंद्रशासित प्रदेश करा’

दरम्यान, सोमवारी जो प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ मंगळवारी बेळगाव, खानापूर, निपाणीसह जवळच्या खेडेगावातील सीमाभागात बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी विद्यार्थ्यांना शाळेत न येण्याचं आव्हानं एकीकरण समितीमार्फत करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT