Rane vs Shivsena : शिवसैनिकांनी काळं फासलं, भाजप कार्यकर्त्यांनी दुधाचा अभिषेक केला
राज्यात आज दिवसभर शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष रस्त्यावर पहायला मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध केलेल्या वक्तव्यामुळे पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली आहे. दिवसभर राज्यभरातही सेना कार्यकर्त्यांनी राणेंविरुद्ध निदर्शन केली. सकाळी सांगलीत शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या नारायण राणेंच्या फोटोला काळं फासलं. यानंतर भाजपनेही शिवसेनेच्या या कृतीला उत्तर देत नारायण राणेंच्या […]
ADVERTISEMENT
राज्यात आज दिवसभर शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष रस्त्यावर पहायला मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध केलेल्या वक्तव्यामुळे पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली आहे. दिवसभर राज्यभरातही सेना कार्यकर्त्यांनी राणेंविरुद्ध निदर्शन केली. सकाळी सांगलीत शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या नारायण राणेंच्या फोटोला काळं फासलं.
ADVERTISEMENT
यानंतर भाजपनेही शिवसेनेच्या या कृतीला उत्तर देत नारायण राणेंच्या फोटोवर दुग्धाभिषेक करत शिवसेनेला डिवचलं आहे. “शिवसैनिकांना सत्तेचा उन्माद आलेला आहे हे त्यांच्या कृतीतून जाणवतं आहे. तुम्हाला काही करायचं होतं तर फोटो काढून करता आलं असतं पण ऑफीसबाहेर असलेल्या होर्डिंगवर असा भ्याड हल्ला करण्याची शिवसेनेला गरज नव्हती. त्यांनी केलेल्या या कृत्याविरुद्ध आम्ही पोलिसांत तक्रार दाखल करणार आहोत. शिवसैनिकांनी काळं फासल्यानंतर आम्ही राणे साहेबांच्या फोटोला दुग्धाभिषेक करुन शुद्धीकरण केलं आहे”, अशी प्रतिक्रीया आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली आहे.
‘कोरोना हृदय सम्राट’ गप्प का? Rane vs Shivsena राड्यादरम्यान गर्दीवरुन मनसेची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
हे वाचलं का?
जन आशिर्वाद यात्रेच्या निमीत्ताने मुंबईत आले असताना नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं दर्शन घेतलं. यानंतर स्थानिक शिवसैनिकांनीही या स्मारकावर गोमूत्र आणि दुधाने अभिषेक केला होता. शिवसैनिकांच्या या कृतीला भाजपने आज एका प्रकारे प्रतिउत्तर दिलं आहे.
दरम्यान संगमेश्वरमध्ये असताना रत्नागिरी पोलिसांच्या पथकाने नारायण राणेंना ताब्यात घेतलं. यानंतर त्यांना महाड येथे आणण्यात आलं. नाशिकमधील स्थानिक शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. १५ ऑगस्टला झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या व्हायरल व्हिडीओचा आधार घेऊन राणेंनी मी तिकडे असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर राज्यात आज चांगलाच संघर्ष पहायला मिळाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT