Terror Module : “एका विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका, असं राजकीय प्रकरण नाही ना?”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘नवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करणाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यात धारावीत राहणाऱ्या महाराष्ट्रातून जान मोहम्मद शेखला स्पेशल सेलने अटक केली. मुंबईत आणि राज्यात अशी कट कारस्थान सुरु असताना महाराष्ट्र राज्याचं दहशातवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलंय का?’, असा सवाल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

आशिष शेलार यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. शेलार म्हणाले, ‘नॅान कॅाग्निजेबल ऑफेन्समधे केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे राज्याचे पोलीस, पत्रकारांना हात नाही पाय लावू अशी भाषा करणारे पोलीस, विद्यमान आमदाराला लुक आउट नोटीस काढण्याचा प्रताप करणारे पोलीस दहशतवाद्यांच्या बाबतीत का झोपले होते, हे गृहमंत्री स्पष्ट करतील का? या दहशतवादी प्रकरणाची माहिती इंटेलिजन्स, पोलिसांना, गृहमंत्र्यांनी होती, तर मग एका विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका असं राजकीय प्रकरण नाही ना?’, अशी शंका शेलार यांनी उपस्थित केली.

धारावीचा रहिवासी… ‘दाऊद गँग’ कनेेक्शन… ‘मुंबई’तून निघाला होता दिल्लीला; ATS ची माहिती

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘पोलिसांच्या इंटेलिजन्स फेल्युअरवर गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी’, अशी मागणीही आशिष शेलार यांनी यावेळी केली.

दहशतवादी मोड्युलचं मुंबई कनेक्शन, ड्रायव्हर म्हणून वावरत होता दहशतवादी समीर

ADVERTISEMENT

‘आता सरकार बैठका घेत असलं, तरी झालेल्या अक्षम्य दुर्लक्षावर आता पांघरुण घालता येणार नाही. राजकर्ते पोलिसांच लक्ष नको त्या विषयात घालतात मग अशा घटना घडतात. आमचे पोलीस सक्षम आहेत, पण राजकीय दबाव, सरकारची गटबाजी, वसुलेबाजी, आणि सौदेबाजी यामुळे ही स्थिती आली आहे’, असं ते म्हणाले. ‘चौकशी अजून वाढवावी आणि गृहमंत्र्यांनी आपली भुमिका स्पष्ट करावी’, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT