राणेंच्या कर्तृत्वाची उंची वाढतच जाणार, म्हणूनच तर शिवसेनेला ते झेपलं नाही – चित्रा वाघ यांचा पलटवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारावरुन भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या संजय राऊतांना चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणेंना मिळालेलं पद, प्रीतम मुंडेंची डावललेली संधी, स्मृती इराणी यांचं डिमोशन अशा अनेक विषयांवर राऊत यांनी भाजपला टोले लगावले होते. राणेंची राजकीय उंची ही मोठी आहे, त्यांना अधिक चांगलं पद देता येऊ शकलं असतं असं संजय राऊत म्हणाले होते.

ADVERTISEMENT

राऊतांच्या या टीकेला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी. “राणेंच्या कर्तृत्वाची उंची ही खरंच खूप मोठी आहे, कधी नव्हे ते तुम्ही खरं बोललात. त्याच्या कर्तृत्वाची उंची ही वाढतच राहणार आहे, म्हणूनच तर ते शिवसेनेला झेपलं नाही”, असा टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी आधी त्यांच्या भावाच्या मंत्रीपदाचं पहावं म्हणजे आम्हालाही काँग्रेस-राष्ट्रवादीचे आभार मानण्याचं सौभाग्य प्राप्त होईल असं चित्रा वाघ म्हणाल्या.

हा पंकजा मुंडेंना संपूर्ण खतम करायचा डाव, Cabinet Expansion वरुन शिवसेनेने भाजपला डिवचलं

हे वाचलं का?

यावेळी संजय राऊत यांनी स्मृती इराणींबद्दल केलेल्या वक्तव्यावरुनही चित्रा वाघ यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला. महिलांबद्दल बोलताना भान राखा, नाहीतर आम्हालाही आरे ला कारे करता येतं असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

ADVERTISEMENT

दरम्यान, पालिकेच्या शाळेतील एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावरून स्मृती ईराणी यांच्यावर टीका केली होती. शिक्षणाचा कसा खेळखंडोबा आहे बघा. या देशाला नवे शिक्षण मंत्री मिळाले. त्यांचं नाव धर्मेंद्र प्रधान. चांगले आहेत ते. काल पर्यंत ते पेट्रोल विकत होते. पेट्रोलियम मंत्री होते ते. त्यांच्या आधी रमेश पोखराल नावाचे शिक्षण मंत्री होते. ते शाळेतच कधी गेले नव्हते. पण ते शिक्षण मंत्री होते. आता त्यांना कळलं की त्यांना काही येत नाही. त्या आधी स्मृती ईराणी. मॉडेलिंग करायची. म्हणजे शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोकं आपलं शिक्षण खातं सांभाळायचे आहे. म्हणून तो चित्रपट आला होता. शिक्षणाचा आयचा घो. बरोबर आहे ते, असं राऊत म्हणाले होते.

ADVERTISEMENT

Cabinet Expansion : मंत्रीमंडळातले बरेचसे सदस्य लाटेबरोबर वाहून आलेले ओंडके, ‘सामना’ मधून टिकेचे बाण

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT