तुरूंगात पुस्तक वाचतानाचा नितेश राणेंचा फोटो व्हायरल, व्हायरल फोटोचं सत्य काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतले शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी नितेश राणे यांना बुधवारी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. यावेळी सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या बाहेर भाजप कार्यकर्ते आणि नितेश राणे समर्थकांची गर्दी होती. अटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नितेश राणेंना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. नितेश राणे यांची पहिली रात्र पोलीस स्टेशनमध्ये गेली आहे.

ADVERTISEMENT

यानंतर गुरूवारी सकाळपासूनच नितेश राणे यांचा एक फोटो व्हायरल होतो आहे. या फोटोत नितेश राणे गजाआड झालेले दिसत असून सतरंजीवर बसलेले आहेत आणि पुस्तक वाचत आहेत. सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र हा फोटो आत्ताचा नाही तर 2015 मधला आहे ही माहिती आता समोर आली आहे. नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाळू प्रश्नावर राडा केला होता. त्याप्रकरणी त्यांना पाच वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र सध्या अटक झाल्यानंतर त्यांचा हा जुना फोटो पुन्हा व्हायरल होत आहे.

हे वाचलं का?

नितेश राणेंना अटक झाल्यानंतर त्यांचा हाच फोटो व्हायरल झाला आहे

संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपी आमदार नितेश राणे अखेर आज न्यायालयासमोर शरण झाले. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन फेटाळून लावल्यानंतर राणे काय करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर बुधवारी नितेश राणे यांनी न्यायालयासमोर हजर होण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ADVERTISEMENT

Nitesh Rane Police custody : नितेश राणे अटकेआधी काय म्हणाले?

ADVERTISEMENT

नितेश राणे काय म्हणाले?

‘न्यायालयाच्या आदेशाचा आदर ठेवून शरण जात आहे. आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीरपणे अटक करण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः न्यायालयाचा आदर ठेवून कणकवली न्यायालयात हजर होत आहे,’ असं आमदार नितेश राणे यांनी न्यायालयासमोर हजर होण्यापूर्वी सांगितलं. दरम्यान, न्यायालयासमोर हजर झाल्यानंत नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या सगळ्यानंतर आता नितेश राणे यांचा पाच वर्षांपूर्वीचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र हा फोटो बुधवारचा नसून पाच वर्षांपूर्वीचा आहे हे आता स्पष्ट झालं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT