Andheri By Poll : उद्धव ठाकरे मानसिक त्रास देत असल्याचं रमेश लटकेंना सांगितलं होतं, नितेश राणेंचा आरोप
मुंबईत आणि महाराष्ट्रात सध्या मोठी चर्चा रंगली आहे ती अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने गुरूवारपर्यंत मंजूर केला नव्हता. गुरूवारी कोर्टात यासंदर्भात सुनावणी झाली आणि त्यानंतर लटके यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. ऋतुजा लटके या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून त्या […]
ADVERTISEMENT
मुंबईत आणि महाराष्ट्रात सध्या मोठी चर्चा रंगली आहे ती अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने गुरूवारपर्यंत मंजूर केला नव्हता. गुरूवारी कोर्टात यासंदर्भात सुनावणी झाली आणि त्यानंतर लटके यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. ऋतुजा लटके या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून त्या निवडणूक लढवत आहेत. अशात रमेश लटकेंबाबत नितेश राणे यांनी उद्वव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे नितेश राणे यांनी?
“रमेश लटके यांचं काम कुणीही नाकारणार नाही. मात्र मातोश्रीवर त्यांचा किती अपमान झाला हे मला रमेश लटके यांनीच अंगणेवाडीसाठी जात असताना विमानतळावर सांगितलं होतं. उद्धव ठाकरे अपमान करतात, फोन उचलत नाहीत, भेटत नाहीत असं मला रमेश लटके यांनी सांगितलं. माणूस जिवंत असताना तुम्ही त्या माणसाला किंमत देत नाही नंतर तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुटुंबाचा वापर करता” असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरेंनाही दिलं उत्तर
आम्ही गद्दारांसोबत नाही हे दाखवण्यासाठी ही निवडणूक आहे असं आदित्य ठाकरे बोलले त्याविषयी नितेश राणे यांना विचारलं असता जेव्हा बाळा सावंत यांच्या निधनानंतर तृप्ती सावंत निवडणूक लढवून आमदार झाल्या तेव्हा त्यांचेही फोन यांनी उचलले नाहीत. आता ऋतुजा लटके ताईंचा घाणेरड्या राजकारणासाठी वापर करत होतो आहे. मातोश्रीत कुणाला किती आदर मिळतो ते तृप्ती सावंत यांना विचारा असंही नितेश राणेंनी म्हणत आदित्य ठाकरेंना उत्तर दिलं आहे.
हे वाचलं का?
रमेश लटके असते तर ते एकनाथ शिंदेंसोबत उभे असते
रमेश लटके आज जिवंत असते तर ते एकनाथ शिंदेंसोबत उभे असते असाही महत्त्वाचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. ऋतुजा लटके असोत किंवा रमेश लटके असोत सगळ्यांना मातोश्रीकडून त्रास दिला गेला आहे असाही आरोप नितेश राणे यांनी केला.
नितेश राणे यांनी उडवली मशाल चिन्हाची खिल्ली
भाजपचे आमदार नितेश राणे हे आज निवडणूक अधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंच्या गटाला निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या मशाल या चिन्हाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी नितेश राणे यांनी मशाल चिन्हाची खिल्ली उडवली. नितेश राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला निवडणूक आयोगाने दिलेलं चिन्ह म्हणजे मशाल नसून तो आइस्क्रिमचा कोन आहे. उद्धव ठाकरेंचं चिन्ह मशाल असूच शकत नाही. निवडणूक आयोगालाही कळलं की हा थंड माणूस आहे त्यामुळे आईस्क्रिमचा कोनच त्यांना चिन्ह म्हणून दिला आहे.” असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि मशाल चिन्हाची खिल्ली उडवली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT