नागपूर ते शिर्डी ” पत्रकार म्हणून मी पाहिलेला समृद्धी महामार्ग”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव समृद्धी महामार्गास देण्यात आले आहे. त्यांचे नाव देण्यात आलेल्या महामार्गावरून चालण्याचा विशेष आनंद आहे. राज्याच्या विकासासाठी समृध्दी महामार्ग गेमचेंजर ठरेल, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. नागपूर विमानतळाबाहेर आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ADVERTISEMENT

उत्तम दर्जाचे रस्ते हे देशाच्या विकासासाठी खूप महत्वाचे असतात. रोड Connectivity चांगली असणे हे विकास होण्यासाठी फार महत्वाचे असते. समृद्धी महामार्गावरून प्रवास करतांना विशेष करून जाणवलेली बाब म्हणजे येत्या काळात हा महामार्ग महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी खरच गेम चेंजर ठरणार आहे..

समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना अगदी पोटाचे पाणी सुद्धा हलू नये इतके चांगले आणि दर्जेदार बांधकाम झाले असल्याचे जाणवते. वाहनांची वेग मर्यादा ही 150 किलोमीटर प्रति तास असल्याने अपघात होऊ नए आणि वन्य प्राण्यांना धोका होऊ नए म्हणून जागोजागी महामार्गाच्या दोन्ही बाजूला तारेचे कंपाउंड आणि सिमेंट प्री कास्ट उभारण्यात आले आहेत.. वन्य प्राण्यांनी रस्ता ओलांडू नए त्यासाठी या उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

हे वाचलं का?

प्रत्येक किलोमीटरवर प्रवाशांची समृद्धी महामार्गाच्या झिरो माईल पासून किती अंतर पार केले आहे याचे छोटे फलक सुद्धा रस्त्याच्या कडेला लावण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंप आणि युटिलिटी चे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होणार आहे..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गांचे लोकार्पण होणार आहे. हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस असेल, नागपूर ते शिर्डी 521 किमीचा मार्ग सुरू होईल. नागरिकांची या महामार्गामुळे मोठी सोय होईल. नागपूर ते शिर्डी थेट कनेक्टिव्हिटी या महामार्गामुळे मिळणार आहे. देशातला आणि राज्यातला हा गेमचेंजर प्रकल्प असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतूनच हा भव्य दिव्य महामार्ग साकार झाला आहे..

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या संकल्पनेतून या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. त्यांच्यासमवेत या महामार्गाची उदघाटनापूर्वी पाहणी करण्याचा विशेष आनंद आहे. समृद्धी महामार्गामुळे 16 ते 18 तासांचे अंतर सहा ते सात तासांवर येणार आहे. मुंबई आणि नागपूर ही शहरे जवळ येतील, उद्योगधंदे वाढतील. शेतक-यांनाही दळणवळणास मदत होईल. अनेक जिल्हे या महामार्गामुळे जोडले जातील. या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. त्याच मार्गावरुन प्रवास करण्याचा वेगळा आनंद आहे.

ADVERTISEMENT

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या टप्प्याचे उद्घाटन 11 डिसेंबर रोजी नागपुरात होणार आहे.

समृध्दी महामार्गाची ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत..

1) महाराष्ट्र समृद्धी महामार्ग एकमेव ग्रीन एक्स्प्रेस वे असणार आहे.

2) वाहनांचा वेग हा घाटात प्रतितास 120 किलोमीटर आणि सपाट रस्त्यावर 150 किलोमीटर आहे.

3) नागपूर ते मुंबई प्रवासी वाहतूक आठ तासात आणि नागपूर ते शिर्डी प्रवास 5 तासात शक्य होणार आहे.

4) राज्याच्या पाच महसूल विभागांच्या दहा जिल्ह्यातील 26 तालुक्यांमधील 392 गावांमधून जाणारा हा सहा पदरी महामार्ग

5) नागपूरमधील मिहानला राज्यातील अनेक जिल्हे हे जोडले जाणार आहेत.

6) हा प्रकल्प देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या समृद्धीसाठी महत्वाचा ठरणार आहे.

7) प्रकल्पाची अंदाजे किंमत: रु 55,000 कोटी

8) प्रकल्पाची लांबी: 701 किमी

9)बांधकामासाठी संपादित जमीन : ९,९०० हेक्टर

10) कृषी समृद्धी नगर विकसित करण्यासाठी संपादित केलेली जमीन: 10,000 हेक्टर

11) सोयी-सुविधांसाठी संपादित केलेली जमीन: १४५ हेक्टर

12) स्थिती: नागपूर ते शिर्डी या 521 किलोमीटर लांबीचे 11 डिसेंबर 2022 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे..

13) प्रवास वेळ: मुंबई ते नागपूर प्रवासासाठी 8 तास, नागपूर ते शिर्डी 5. 30 तास

14) समृद्धी महामार्गाचे मालक: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर ते शिर्डी या रविवारी झालेल्या समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यात आज तक, मुंबई तक हे एकमेव चॅनल होते जे अगदी सुरुवाती पासून शेवट पर्यंत सोबत होते..

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT