Mumbai Rain : अपघात झाला तर आमची जबाबदारी नाही, १७ भागांमधील लोकांना घरं रिकामी करण्याचे BMC चे आदेश
मुंबईत मान्सूनचं आगमन झाल्यानंतर पावसामुळे अनेक जीर्ण आणि धोकादायक इमारती पडण्याच्या घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वीच मालाड येथील इमारत दुर्घटनेत काही जणांना आपले प्राण गमवावे लागले. मुंबईत सध्या पावसाने उसंत घेतली असली तरीही महापालिकेने आगामी मान्सूनचा कालावधी लक्षात घेता शहरातील १७ भागांमधील लोकांना घरं रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. एवढंच नाही तर नोटीस दिल्यानंतरही लोकांनी […]
ADVERTISEMENT
मुंबईत मान्सूनचं आगमन झाल्यानंतर पावसामुळे अनेक जीर्ण आणि धोकादायक इमारती पडण्याच्या घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वीच मालाड येथील इमारत दुर्घटनेत काही जणांना आपले प्राण गमवावे लागले. मुंबईत सध्या पावसाने उसंत घेतली असली तरीही महापालिकेने आगामी मान्सूनचा कालावधी लक्षात घेता शहरातील १७ भागांमधील लोकांना घरं रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. एवढंच नाही तर नोटीस दिल्यानंतरही लोकांनी घरं रिकामी केली नाहीत आणि पावसामुळे एखादा अपघात घडला तर त्याला मुंबई महापालिका जबाबदार राहणार नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
तारेवरची कसरत
मुंबईच्या S वॉर्डातील १७ भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना BMC ने ही नोटीस दिली आहे. नाले आणि दरड क्षेत्राच्या जवळ राहणाऱ्या लोकांना या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या पावसात नाल्यांमधलं पाणी तुंबून पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच दरड क्षेत्रातही घरांवर दरड कोसळण्याचा धोका असतो, त्यामुळे या भागांमधील लोकांना आपली घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे वाचलं का?
Water Logging in Mumbai : नाल्यात कचरा टाकाल तर २०० रुपये दंड – BMC चा निर्णय
मुंबईच्या S वॉर्डात विक्रोळी, पवई आणि भांडूप या तीन प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो. यापैकी सूर्यनगर, इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभीम नगर, गौतमगार, भांडूप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर परिसर, नारदास नगर, गावदेवी हिल परिसर, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, अशोक टेकडी आणि आंबे भरणी १७ भागांमधील लोकांना BMC ने आपापली घरं रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT
या विभागांमधील लोकांना आपली घर स्वतःच्या जबाबदारीवर रिकामी करायची आहेत. एखाद्या नैसर्गिक आपत्तीत घराचं नुकसान झालं किंवा कोणतीही जिवीतहानी झाली तर त्याला महापालिका जबाबदार राहणार नाही अशी माहिती S वॉर्डाच्या सहायक महापालिका आयुक्तांनी दिली. मुंबईत सध्याच्या घडीला ४०० पेक्षा जास्त धोकादायक इमारती आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT