Maratha Reservation : ‘जोशी-फडणवीसांनी काम केलं, इच्छाशक्ती असेल तर बाकीचेही करतील’
मराठा आणि ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर कात्रीत सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारवर भाजपने सध्या जोरदार हल्लाबोल चढवला आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करताना, जोशी-फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना काम केलं इच्छाशक्ती असेल तर बाकीचेही काम करतील असा टोला लगावला आहे. संन्यास घेतील तुमचे दुष्मन ! शिवसेनेच्या देवेंद्र फडणवीसांना कोपरखळ्या आतापर्यंत […]
ADVERTISEMENT
मराठा आणि ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर कात्रीत सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारवर भाजपने सध्या जोरदार हल्लाबोल चढवला आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करताना, जोशी-फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना काम केलं इच्छाशक्ती असेल तर बाकीचेही काम करतील असा टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
संन्यास घेतील तुमचे दुष्मन ! शिवसेनेच्या देवेंद्र फडणवीसांना कोपरखळ्या
आतापर्यंत राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले. काँग्रेसचं सरकार राज्यात असताना मराठ्यांना आर्थिक निकषावर आरक्षण मिळू शकलं असतं, पण तसं झालं नाही. शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी ब्राम्हण होते, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कामं झाली पण नंतर इच्छाशक्तीच नसल्यामुळे काम होतं नाहीयेत, असं म्हणत नरेंद्र पाटलांनी ठाकरे सरकारसह काँग्रेस-राष्ट्रवादीलाही टोला लगावला.
हे वाचलं का?
संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा, खातो सेनेचं जागतो पवारांना – गोपीचंद पडळकर
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आला तेव्हा तो मराठ्यांचा पक्ष म्हणूनच ओळखला जात होता. सगळ्यात जास्त मराठे त्याच पक्षात आहेत तरीही मराठ्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे मराठ्यांचा वापर फक्त मतपेटीसाठी करायचा की त्यांना आरक्षण मिळवून देत त्यांची मुलं UPSC/MPSC पास झाली पाहिजेत यासाठी प्रयत्न करायचे हे त्यांनी ठरवायचं आहे असंही नरेंद्र पाटील म्हणाले.
ADVERTISEMENT
एकटेच संन्यास घेणार की मोदींना घेऊन? रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना सवाल
ADVERTISEMENT
राज्यात ओबीसींचं आंदोलन झालं, आशा सेविकांचं आंदोलन झालं, निवडणुका झाल्या तिकडे कोरोना येत नाही मग मराठा आंदोलनाच्यावेळी कोरोना कसा येता असा सवालही नरेंद्र पाटलांनी यावेळी राज्य सरकारला विचारला. ४ जुलै रोजी सोलापुरात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आक्रोश मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचंही नरेंद्र पाटलांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT