ब्रिटनमध्ये कमी झाली ख्रिश्चानांची लोकसंख्या; मुस्लिमांची संख्या वाढली, हिंदुंची स्थिती काय?
ब्रिटनमधील ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे तर मुस्लिमांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या जनगणनेच्या अहवालानुसार, इंग्लंड आणि वेल्समधील 46.2 टक्के म्हणजेच 27.5 दशलक्ष लोकांनी स्वत:ला ख्रिश्चन असल्याचे सांगितले. यूके ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स (ONS) नुसार, 2011 च्या आकडेवारीच्या तुलनेत 2021 मध्ये ख्रिश्चन लोकसंख्येमध्ये 13.1 टक्के घट झाली आहे. तर 10 वर्षांच्या […]
ADVERTISEMENT
ब्रिटनमधील ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे तर मुस्लिमांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या जनगणनेच्या अहवालानुसार, इंग्लंड आणि वेल्समधील 46.2 टक्के म्हणजेच 27.5 दशलक्ष लोकांनी स्वत:ला ख्रिश्चन असल्याचे सांगितले. यूके ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स (ONS) नुसार, 2011 च्या आकडेवारीच्या तुलनेत 2021 मध्ये ख्रिश्चन लोकसंख्येमध्ये 13.1 टक्के घट झाली आहे. तर 10 वर्षांच्या कालावधीत मुस्लिमांची लोकसंख्या 4.9 टक्क्यांनी वाढली आहे.
ADVERTISEMENT
सध्या, ब्रिटनमध्ये 39 लाख मुस्लिम राहतात, ज्यांचा एकूण लोकसंख्येच्या 6.5 टक्के वाटा आहे. जनगणनेच्या अहवालानुसार हिंदूंची लोकसंख्या 10 लाख आहे. 2011 साली हिंदूंची लोकसंख्या 1.5 टक्के होती, ती आता 1.7 झाली आहे. त्याचबरोबर शिखांची लोकसंख्या पाच लाख 24 हजार, बौद्ध समाजाची दोन लाख 73 हजार आणि ज्यूंची लोकसंख्या दोन लाख 71 हजार आहे.
नास्तिकांची संख्या वाढली
दुसरीकडे, सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे सुमारे दोन कोटी 20 लाख लोकांनी आपला धर्म घोषित केला नाही. गेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार, यावेळी अशा लोकांच्या संख्येत 12 अंकांची बंपर वाढ झाली आहे.चर्च ऑफ यॉर्कचे प्रमुख स्टीफन कॉट्रेल यांनी या अहवालावर म्हटले आहे की, कालांतराने ख्रिश्चनांची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे, हे आश्चर्यकारक नाही. ते पुढे म्हणाले की युरोपमधील जीवन संकट आणि युद्धाचा सामना करणार्या लोकांना अजूनही अध्यात्माचा आधार घ्यावा लागेल. दुसरीकडे, नास्तिकांच्या हक्कांबद्दल बोलणाऱ्या ह्युमॅनिस्ट या ग्रुपचे मुख्य कार्यकारी अँड्र्यू कॉपसन म्हणाले की, सरकारने धर्माशी संबंधित मुद्द्यांवर आपली धोरणे बदलली पाहिजेत. या मुद्द्यांमध्ये चर्च ऑफ इंग्लंड आणि धार्मिक शाळांना सरकारचा पाठिंबा आहे.
हे वाचलं का?
अँड्र्यू म्हणाले की, इराण हा जगातील एकमेव देश आहे जिथे महासभेत मतदानासाठी धार्मिक नेत्यांचाही समावेश केला जातो. ते म्हणाले की, हा जनगणना अहवाल समाजातील धर्माच्या भूमिकेवर पुनर्विचार करण्यासाठी लोकांना झोपेतून जागे करणारं आहे.
ऋषी सुनक यांच्या प्रवक्त्याचे विधान
दुसरीकडे, भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे प्रवक्ते या जनगणनेच्या अहवालाबाबत म्हणाले की, ब्रिटन हा विविधतेने भरलेला देश असून त्याचे स्वागत केले पाहिजे. या जनगणनेच्या अहवालात फक्त ब्रिटन आणि वेल्समधील लोकांचा समावेश करण्यात आला आहे. स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडचे आकडे स्वतंत्रपणे जाहीर केले आहेत.
ADVERTISEMENT
अहवालानुसार, 2011 च्या तुलनेत श्वेत समाजातून आलेल्या लोकांच्या लोकसंख्येत घट झाली आहे. 2011 च्या तुलनेत 2021 मध्ये स्वतःला गोरे म्हणवणाऱ्या लोकांच्या संख्येत पाच लाखांनी घट झाली आहे. त्याच वेळी, या गोर्यांमध्ये स्वतःला ब्रिटीश म्हणवणाऱ्या लोकांच्या संख्येतही सहा टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. इतर देशांतून येऊन तेथे स्थायिक झालेल्या गोर्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याच वेळी, गोरे लोकांनंतर, बहुतेक लोकांनी त्यांचे मूळ आशियाई, आशियाई ब्रिटिश आणि आशियाई वेल्श असे सांगितले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT