काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या जावयाच्या भावावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– समीर शेख, पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी

ADVERTISEMENT

कंपनीचा बनावट सही-शिक्का वापरुन व्यवसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जावयाचे भाऊ रोहित काळभोर आणि व्याही शंकर काळभोर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात तक्रारदार पवन लोढा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

४ डिसेंबर २०१७ ते २८ मार्च २०१९ या कालावधीत हा गुन्हा घडला होता. परंतू सुरुवातीला पोलिसांनी हा गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केल्यानंतर लोढा यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर पिंपरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

हे वाचलं का?

तक्रारदार लोढा यांची चाकण परिसरात एक कंपनी आहे. ही कंपनी भंगार मालापासून अ‍ॅल्युमिनीयमच्या सळया, पत्रे बनवण्याचं काम करते. लोढा यांनी रोहित काळभोर यांच्या ट्रेड होम या कंपनीकडून भंगाराचा माल घेतला होता. या मालाचे पैसे लोढा यांनी काळभोर यांना ठरल्याप्रमाणे दिले. मालाच्या पुवठ्यासाठी हमी म्हणून रोहित काळभोर याने लोढा यांच्याकडून १० लाख रुपयांचे सात आणि ८ लाख ९२ हजार ६५८ रुपयांचा एक असे ८ घेत घेतले. हे धनादेश लोढा यांनी रोहित काळभोर याच्या कोहिनूर कंपनीच्या नावाने दिले होते. परंतू लोढा यांनी भंगारमालाचे सर्व पैसे दिल्यानंतरही काळभोर बाप-लेकाने हमी म्हणून दिलेले धनादेश गैरवापर करुन बँकेत भरल्याचा आरोप तक्रारदार लोढा यांनी केला आहे.

लोढा यांनी यानंतर बँकेत फोन करुन धनादेशाचं पेमेंट थांबवण्यास सांगितल्यामुळे काळभोर यांनी टाकलेले चेक वटले गेले नाहीत. यानंतर काळभोर यांनी लोढा यांना आपल्या वकीलामार्फत नोटीस पाठवली. यानंतर पिंपरी येथील न्यायालयात लोढा यांच्या कंपनीविरुद्ध फौजदारी दावा दाखल करण्यात आला. हा खटला दाखल करताना आरोपींनी फिर्यादीच्या सहीचा आणि त्यांच्या कंपनीच्या बनावट शिक्क्यांचा वापर केला होता. नंतर ही कागदपत्रे पडताळणीसाठी पाठवण्यात आली होती. त्यात सही आणि शिक्के बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे अखेर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान या प्रकरणात अद्याप कोणत्याही व्यक्तीला अटक झालेली नसून पोलिसांनी तपासाबद्दल अधिकची माहिती देण्यास नकार दिला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT