NSE Scam : चित्रा रामकृष्ण यांचे सहकारी आनंद सुब्रमण्यम यांना सीबीआयने केली अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

NSE अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये घोटाळा केल्या प्रकरणी सीबीआयने आता आनंद सुब्रमण्यम यांना अटक केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये चित्रा रामकृष्ण यांचे सहकारी आनंद सुब्रमण्यम यांनी काही वर्षांपूर्वी घोटाळा केला, त्याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळीच आनंद सुब्रमण्यम यांना अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

NSE को लोकेशन स्कॅममध्ये सीबीआयकडून आनंद सुब्रमण्यम यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सीबीआय अज्ञात योगी आणि चित्रा रामकृष्ण यांच्यात झालेल्या चर्चेविषयी आणि ईमेल विषयीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. आनंद सुब्रमण्यम याबाबत योग्य माहिती देत नाहीत असंही सीबीआयने स्पष्ट केलं आहे.

चित्रा रामकृष्ण यांच्यासोबत बातचीत करणारा अज्ञात योगी दुसरा तिसरा कुणी नाही तर आनंद सुब्रमण्यमच आहेत असं सीबीआयला वाटतं आहे. NSE ने सेबीला दिलेल्या सबमिशनमध्ये असं म्हटलं आहे की आनंद हाच योगी आहे जो चित्रा रामकृष्ण यांच्यावर प्रभाव टाकत होता. फेक आयडेंटीटी क्रिएट करून त्याने फायदा उचलाला. सेबीने एनएसईचं हे म्हणणं मान्य केलं नाही.

हे वाचलं का?

सेबीने नुकतंच एक पत्रक जाहीर केलं आहे. त्यामध्ये नमूद केल्यानुसार 2013 मध्ये NSE च्या माजी सीईओ आणि एमडी चित्रा रामकृष्ण यांनी आनंद सुब्रमण्यम यांना CSO म्हणजे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर या पदावर नियुक्त केलं होतं. NSE मध्ये त्याआधी असं कुठलंही पद त्याआधी नव्हतं. आनंद सुब्रमण्यम हे आधी Blamer Lawrie या कंपनीत काम करत होते. त्यांची सॅलरी 15 लाख रूपये होते. NSE मध्ये ती वाढवून 1.38 कोटी रूपये करण्यात आली. त्यानंतर त्यांना सातत्याने प्रमोशनही मिळाल. ते ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर अर्थात GOO या पदापर्यंत पोहचले होते.

काय आहे प्रकरण?

ADVERTISEMENT

नॅशनल स्टॉच एक्सचेंजच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चित्रा रामकृष्ण या हिमालयातील योगीच्या सांगण्यानुसार निर्णय होत्या. सेबीने रामकृष्ण आणि इतर अन्य अधिकाऱ्यांविरुद्ध दिलेल्या अंतिम आदेशात या गोष्टीचा खुलासा केला आहे.

ADVERTISEMENT

चित्रा रामकृष्ण यांनी त्यांच्या कार्यकाळात एका हिमालयातील योगीच्या सांगण्यावरूनच आनंद सुब्रमण्यम यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालकाच्या सल्लागार पदावर नियुक्त केले होतं, असं सेबीने म्हटलं आहे. चित्रा रामकृष्ण यांनी सुब्रमण्यम यांना मनमर्जीप्रमाणे अनेकवेळा पगारवाढ दिली. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कामाच्या मूल्याकंनाचे कोणतेही पुरावे नाहीत, असं सेबीने आदेशात म्हटलं आहे.

सेबीकडून शुक्रवारी हा आदेश काढण्यात आला. चित्रा रामकृष्ण यांनी आर्थिक आणि व्यावसायिक योजना, आर्थिक परिमाण आणि इतर अन्य गोपनीय माहिती त्या योगीला दिली. त्याचबरोबर एनएसईमधील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भातही त्यांनी योगीशी चर्चा केली.

चित्रा रामकृष्ण हिमालयातील योगीला शिरोमणी मानायच्या. 20 वर्षांच्या कार्यकाळात व्यावसायिक आणि वैयक्तिक निर्णयासंदर्भात त्या योगीचा सल्ला घेऊन निर्णय घ्यायच्या, असंही सेबीने म्हटलं आहे. चित्रा रामकृष्ण या 2013 ते 2016 या कालावधीत नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT