PAN-Aadhaar लिंक करण्याची शेवटची संधी, आता वेळ दवडू नका, पाहा कसं करता येणार लिंक
मुंबई: खरं तर काल (31 मार्च) पॅन-आधार लिंक करण्याचा शेवटचा दिवस होता. जर कालच्या दिवसात पॅन लिंक केलं नसतं तर आजपासून त्याच गोष्टीसाठी 1000 रुपये मोजावे लागणार होते. दरम्यान, काल रात्री उशिरा केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं की, पॅन-आधार लिंक करण्याची तारीख 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्याकडे तीन महिन्यांचा कालावधी आहे. यामुळे […]
ADVERTISEMENT

मुंबई: खरं तर काल (31 मार्च) पॅन-आधार लिंक करण्याचा शेवटचा दिवस होता. जर कालच्या दिवसात पॅन लिंक केलं नसतं तर आजपासून त्याच गोष्टीसाठी 1000 रुपये मोजावे लागणार होते. दरम्यान, काल रात्री उशिरा केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं की, पॅन-आधार लिंक करण्याची तारीख 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्याकडे तीन महिन्यांचा कालावधी आहे.
यामुळे आता वेळ न दवडता पॅन-आधार लिंक करा. कारण आता या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला भुर्दंड बसण्याची दाट शक्यता आहे.
कोरोना साथीच्या आजारामुळे उद्भवणार्या अडचणी लक्षात घेता केंद्र सरकारने पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2021 ऐवजी 30 जून 2021 केली आहे.
कोरोना संकटामुळे किंवा इतर कोणत्याही कारणास्तव आपण आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकला नाही तर आपल्यासाठी दिलासा देणारी ही बातमी आहे. पॅनकार्ड आधार कार्डशी जोडण्यासाठी आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ देऊन केंद्र सरकारने 30 जून ही आता अंतिम तारीख दिली आहे.









