खूप काहीतरी होणार आहे; यशवंत जाधवांच्या ‘डायरी’वर पाटलांचं सूचक विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यामागे आयकर विभागाचा ससेमिरा लागला असून, आयकरच्या हाती यशवंत जाधवांची ‘डायरी’ लागली आहे. या डायरीत अनेक महत्त्वाच्या नोंदी असल्याची माहिती समोर आली आहे. याच डायरीवरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे, तर अजित पवारांचं कौतुक केलं आहे.

ADVERTISEMENT

रविवारी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडीचे महान नेते काहीही आरोप करत असले, तरी या यंत्रणा स्वायत्त आहेत. ते काय करणार आहेत, आधीच सांगत नाही. काय केलं सांगणार नाही. काही कारणच नाही. आम्हाला काही अधिकारच नाही. डायरी सापडलीये का? त्यात काही नोंदी सापडल्यात का? मला काहीही माहिती नाही.”

IT Raid: अजून काय-काय आहे यशवंत जाधवांच्या ‘त्या’ डायरीत?

हे वाचलं का?

“मला खूप दिसतं. मला एवढंच दिसतंय की खूप काहीतरी होणार आहे. अशी डायरी सापडली असेल आणि त्यांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली असेल, तर योग्यच आहे. या चौकशीतून कुणीही सुटत नाही. माझी राऊतांकडून चेष्टा केली जाते, पण सगळी चेष्टा अंगावर येणार आहे. कारण मी जे जे म्हणेन ते ते खरं ठरत चाललं आहे.”

यशवंत जाधव प्रकरण: IT छाप्यात सापडलेल्या ‘डायरी’मध्ये ‘मातोश्री’ला 2 कोटी, जाधव म्हणतात.. मातोश्री म्हणजे त्यांची आई!

ADVERTISEMENT

“मी असं म्हटलं की काही जात्यात आहे, तर काही सुपात आहे. जात्यात होते त्यांचं पीठ झालं, आता सुपातील जात्यात जायला लागले आहेत. इतकंच मला म्हणायचं आहे.” राऊतांनी केलेल्या टीकेला पाटील म्हणाले, सामना वाचणं बंद केलं आहे आणि संजय राऊतांबद्दल बोलणंही बंद केलं आहे,” असं पाटील म्हणाले.

“मी परवा सभागृहात असताना अजित पवारांना चिठ्ठी लिहिली होती. त्यांना सांगितलं की, तुम्ही एसटी संपाच्या प्रश्नात पुढाकार घ्या आणि एसटी कामगारांचा संप संपवा. मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. त्या संपात १ लाख घरं उद् ध्वस्त झाली. पुन्हा एक लाख घरं उद्ध्वस्त होतील. त्यामुळे मी अजित पवारांना म्हटलं. कारण त्यांच्याकडून आशा आहे. याचा लगेच असा अर्थ लावू नका की, अजित पवार बाहेर पडणार आहेत आणि भाजप सत्तेत येणार आहे. अजित पवारांमध्ये ती धमक आहे”, असं पाटील म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT