संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिवादन

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र दिवसावर कोरोनाचं सावट आहे. महाराष्ट्राने आज 61 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना हुतात्मा चौक येथे जाऊन अभिवादन केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथे असलेल्या स्मारकाला पुष्पचक्र वाहिलं आणि आपला आदर व्यक्त केला.

ADVERTISEMENT

यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनीही हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदर व्यक्त केला.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने काटेकोर निर्बंध लागू केले आहेत. कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम पाळूनच हा 61 वा वर्धापन दिन साजरा केला गेला.

हे वाचलं का?

Maharashtra@61 : इतक्या वर्षात महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला -डॉ. अभय बंग

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाइव्हमध्ये महाराष्ट्र दिवसाबाबत काय म्हणाले?

ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये भाग घेऊन हाल अपेष्टा सोसून, त्याग करून ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्या सगळ्यांना मी नम्रपणे अभिवादन करतो. मुंबई महाराष्ट्राला मिळाली ती यांच्याचमुळे हे विसरता येणार नाही. कामगार दिनही आहे. कामगार दिनाच्याही मी माझ्या सगळ्या कामगार बांधव आणि भगिनींना शुभेच्छा देतो आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याचं महत्त्व म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारही उतरले होते, संपूर्ण कामगार वर्ग उतरला होता. सगळे मराठी माता-भगिनी आणि बांधव उतरले होते.

ADVERTISEMENT

त्यांनी तो लढा दिला नसता तर मुंबई महाराष्ट्राला मिळाली नसती. त्यामुळे शेतकरी आणि कामगार या दोघांचं मोलाचं योगदान हे महाराष्ट्रासाठी आहे. गेल्यावर्षीचा 1 मेचा सोहळा साधेपणाने साजरा करावा लागला कारण लॉकडाऊनच होता. गेल्यावर्षी महाराष्ट्राला 60 वर्षे झाली, यावर्षी 61 वर्षे झाली मत्र दोन्ही वर्षांमध्ये कोरोनाचं सावट आपल्या राज्यावर आहेच.

Maharashtra@61 : कोरोनाशी लढण्याचा संकल्प करून नवा महाराष्ट्र घडवू-बाबा आढाव

आजचा महाराष्ट्र दिवस हा उत्साहात किंवा उत्सवाच्या स्वरूपात आपण साजरा करू शकत नाही कारण एक खूप मोठं संकट आपल्यावर आहे.

मला आठवतोय तो 2010 चा सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र दिन. लाखो लोक जमले होते, बाळासाहेब ठाकरे होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते. संपूर्ण मंगेशकर कुटुंब होतं. बहु असोत सुंदर हे गीत लतादीदींनी गायलं होतं. तो सुवर्णक्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. आत्ताचा जो काळ आहे तोही निघून जाईल आणि आपण महाराष्ट्र दिवस सोन्याच्या झळाळीने साजरा करू शकू असा मला विश्वास वाटतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT