‘असं धाडस करण्याचा प्रयत्नही करू नये’; जिवे मारण्याच्या धमकीनंतर एकनाथ शिंदेंचा इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या माहितीने रविवारी (२ ऑक्टोबर) खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांना स्फोट घडवून आणून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आलीये. या प्रकारानंतर एकनाथ शिंदेंनी धमकी देणाऱ्यांनाच कडक शब्दात इशारा दिलाय. नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याची धमकी एकनाथ शिंदे यांना मिळाल्याची घटना गेल्या काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. त्यावेळी एकनाथ […]
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या माहितीने रविवारी (२ ऑक्टोबर) खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांना स्फोट घडवून आणून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आलीये. या प्रकारानंतर एकनाथ शिंदेंनी धमकी देणाऱ्यांनाच कडक शब्दात इशारा दिलाय.
ADVERTISEMENT
नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याची धमकी एकनाथ शिंदे यांना मिळाल्याची घटना गेल्या काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिंदेंना धमकी मिळाल्याची माहिती समोर आलीये.
धमकीच्या या वृत्तानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही यावर माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली. यावेळी त्यांनी अशा धमक्यांचा परिणाम माझ्यावर होत नाही. मी जनतेची कामं करत राहणार असं म्हटलंय.
हे वाचलं का?
‘असं धाडस करण्याचा प्रयत्नही करू नये’; जिवे मारण्याच्या धमकीनंतर एकनाथ शिंदेंचा इशारा
जिवे मारण्याच्या धमकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
“पूर्वी असं अनेकवेळा झालेलं आहे. त्यामुळे त्याचा परिणाम माझ्यावर होत नाही आणि मी त्याकडे लक्षही देत नाही. सुरक्षेची काळजी पोलिसांनी घेतलेली आहे. नक्षल असतील किंवा देशविघातक शक्ती आहेत, त्यांनी असं पूर्वीही केलेलं आहे. जेव्हा मुख्यमंत्री नव्हतो”, असं शिंदे म्हणाले.
ADVERTISEMENT
“माझ्यासाठी हे काही नवीन नाहीये. मी शेवटी जनतेतला माणूस आहे. मला जनतेत जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. अशा प्रकारच्या बाबी आहेत, त्याचा परिणाम माझ्यावर झालेला नाही. गृहविभाग यासंदर्भात काळजी घेतोय. तशा प्रकारच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत”, असं त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
शिंदे गटाचं ‘विसर न व्हावा!’ कँपेन! उद्धव ठाकरेंना करून दिली त्यांच्याच ‘त्या’ वक्तव्यांची आठवण
कुणीही असं करण्याचं धाडस करू नये; शिंदे काय बोलले?
“आमचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री कायदा सुव्यवस्था राखण्याच्या बाबती सक्षम आहेत. त्यांनी पाच मुख्यमंत्रीपदही सांभाळलेलं आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था गृहविभाग सक्षमपणे सांभाळतोय. त्यामुळे असं कुणाला काही वाटलं, तरी कुणी काही करू शकत नाही. त्याने ते धाडसही करण्याचा प्रयत्न करू नये इतकंच माझं सांगणं आहे”, असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT