Bharat jodo Yatra : स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदा शेतकऱ्यांवर कर लावला : राहुल गांधी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नांदेड : स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर कर लादण्यात आला आहे. ते देखील 28 टक्के, असं म्हणतं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर हल्ला चढवला. ते भारत जोडो यात्रेतील नांदेड येथील नवा मोंढा परिसरातील आयोजित सभेत बोलत होते. राज्यात भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. 

ADVERTISEMENT

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या नोटबंदी, जीएसटी निर्णयांवर आणि उद्योग धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, देशाच चुकीची जीएसटी पद्धत लागू केली. 5 वेगवेगळे कर लागू करण्यात आले. ते देखील 28 टक्के. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच शेतकऱ्यांवरही कर लावण्यात आला. खतांवर कर, अवजारांवर कर. जीएसटी आणून प्रत्येक गोष्टीवर कर लावून समस्या वाढवल्या आहेत, असंही ते म्हणाले.

काँग्रेस अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उपस्थिती :

दरम्यान, आजच्या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रीयन फेटा बांधून त्यांचं आदरातिथ्य करण्यात आलं. त्यांनी सुरुवातीला हिंदीमधून आणि नंतर मराठीतून सभेला संबोधित केलं. याशिवाय राष्ट्रवादीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती होती.

हे वाचलं का?

आदित्य ठाकरेही राहणार उपस्थित :

शुक्रवारी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यासाठी शुक्रवार दुपारी २ वाजता नांदेड विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता चोरंबा फाटा येथे राहुल गांधी यांच्या सोबत पदयात्रेत ते सहभागी होतील. त्यांच्यासह विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नांदेड हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT