राज्यात रुग्णवाढीचा आलेख वाढताच…२५ हजाराहून अधिकांना कोरोनाची लागण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात महाराष्ट्रात २५ हजार ६८१ नवे रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत आज राज्यात रुग्णसंख्या काहीअंशी कमी असली तरीही मृत्यूचा दर हा वाढलेला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यासारख्या सर्व महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

ADVERTISEMENT

सध्या राज्यात पुण्यामध्ये कोरोनाचे सक्रीय रुग्ण असून नागपूर सक्रीय रुग्णांच्या निकषात दुसऱ्या स्थानावर आहे. पुण्यात सध्याच्या घडीला ३७ हजार ३८४ सक्रीय रुग्ण आहेत तर नागपुरात २५ हजार ८६१ सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत सध्याच्या घडीला १८ हजार ८५० सक्रीय रुग्ण आहेत.

मुंबईकरांनो Mall मध्ये जाण्याचा प्लान करताय? मग ही बातमी वाचाच !

हे वाचलं का?

दरम्यान, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असलेल्या महाराष्ट्र सरकारसमोरच्या चिंता काहीकेल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. आज दिवसभरात मुंबई शहरात ३ हजार ६२ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. १० रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू झाला असून महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका प्रशानस शहरात निर्बंध अधिक कडक करण्याच्या विचारात आहे.

तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात वाढत असलेली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. गेल्या २४ तासांत नागपुरात कोरोनाचे ३ हजार २३५ नवे रुग्ण सापडले आहेत. याचसोबत ३५ जणांना कोरोनाशी लढताना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गुरुवारी सापडलेल्या रुग्णांपेक्षा शुक्रवारी सापडलेल्या रुग्णांची संख्या कमी असली तरीही मृतांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे येणाऱ्या काळात नागपूर शहरासाठी विशेष कठोर उपाययोजना अमलात आणण्याचं आव्हान राज्य सरकारसमोर असणार आहे.

ADVERTISEMENT

Corona रुग्ण वाढूनही नागपुरात लॉकडाऊनचा फज्जा, रस्त्यांवर नागरिकांची गर्दी

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT