बापरे! कोरोना परतला, दिल्ली-मुंबईत रूग्णवाढ; XE व्हेरिएंटविषयी डॉक्टरांचा ‘हा’ इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात पुन्हा एकदा कोव्हिड १९ चे म्हणजेच कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे लोकांमधली चिंता वाढली आहे. जगभरातल्या काही देशांसोबतच भारतातही कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य संस्थांच्या चिंतेत भर पडली आहे.

ADVERTISEMENT

गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट समोर येत आहेत. अशात रूग्ण वाढू लागल्याने भारतात कोरोनाची चौथी लाट धडकणार असाही अंदाज व्यक्त केला जातो आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात कोरोनाचे १००७ रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारतातील कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या आता ११ हजार ५८ झाली आहे.

हे वाचलं का?

कोरोना रुग्णसंख्येनं वाढलीये चिंता! महाराष्ट्रासह केंद्राचं पाच राज्यांना पत्र, सतर्क राहण्याचे आदेश

भारतात मागच्या ८० दिवसांमध्ये पहिल्यांदाच कोरोनाची प्रकरणं वाढलेली दिसून येत आहेत. भारतातल्या १८ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मागच्या चोवीस तासात रूग्ण वाढले आहेत. महाराष्ट्र, गुजरात या दोन राज्यांमध्ये XE व्हेरिएंटचीही प्रकरणं समोर आली आहेत. XE व्हेरिएंटच्या अनुषंगाने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांसोबत बुधवारी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी XE व्हेरिएंटच्या रूग्णांवर लक्ष द्या असं सांगितलं आहे. त्यासंबंधीच्या सूचनाही दिल्या आहेत. एवढंच नाही तर कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या गाईडलाईन्सचं पालन केलं जाईल यासंबंधीच्या सूचनाही दिल्या आहेत आणि कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही असंही सांगण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

नोएडा आणि मुंबईत काय आहे परिस्थिती?

ताज्या माहितीनुसार दिल्ली आणि मुंबईत कोव्हिडचे रूग्ण हळूहळू वाढत आहेत. बुधवारी दिल्लीत २९९ रूग्णांची नोंद झाली. पॉझिटिव्हीटी रेट २.४९ टक्के झाला. मागच्या दोन दिवसात दिल्लीत ५०१ रूग्ण आढळले आहेत. आत्ता दिल्लीतल्या सक्रिय रूग्णांची संख्या ८१४ झाली आहे. यातले ४३ रूग्ण रूग्णालयात अॅडमिट झाले आहेत. दिल्लीच्या एका शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे.

मुंबईत बुधवारी कोरोनाचे ७३ रूग्ण आढळले आहे. १७ मार्च २०२२ नंतर रूग्णांची ही सर्वात मोठी संख्या आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या अहवालानुसार कोरोनाची प्रकरणं मुंबईत हळहळू वाढत आहेत. मात्र शहरात मागच्या तीन दिवसात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.

कोरोना परत येतोय का मग ही चौथी लाट असेल?

तज्ज्ञांचं म्हणणं काय?

हिंदुजा रूग्णालय आणि मेडिकल रिसर्च सेंटर खार येथील क्रिटिकल केअर सल्लागार डॉ. भारेश डेढिया यांनी सांगितल्यानुसार, ”XE हायब्रिड स्ट्रेन आणि व्हेरिएंट सारखाच आहे. सध्या तरी असं दिसतंय की XE व्हेरिएंट आणि ओमिक्रॉन यांच्या लक्षणं समान आहेत. हा व्हेरिएंट आपल्याकडे मागचे तीन महिने आहे. मात्र ओमिक्रॉनप्रमाणेच हा पूर्ण जगात पसरलेला नाही. हा काही वेगळा व्हेरिएंट नाही तर ओमिक्रॉनसारखाच आहे.”

दिल्लीच्या IBS रूग्णालयाचे डॉक्टर सचिन कंधारी म्हणतात की नव्या XE व्हेरिएंटबाबत सध्या जास्त माहिती समोर आलेली नाही. फक्त इतकंच कळलं आहे की ओमिक्रॉनप्रमाणेच याचा संसर्ग लवकर होतो. मात्र हा व्हेरिएंट डेल्टा इतका गंभीर नाही.

डॉ. सचिन यांनी हेदेखील सांगितलं आहे की मागच्या काही आठवड्यांमध्ये XE व्हेरिएंटची काही प्रकरणं समोर आली आहेत. मात्र त्याबाबत अजून पूर्ण माहिती समोर आलेली नाही. डेल्टाप्रमाणे हा व्हेरिएंट धोकादायक नाही असं वाटतंय. जगभरात लसीकरण पूर्ण झालेलं नाही त्यामुळेच नवे व्हेरिएंट समोर येत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT