लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार? अदर पूनावालांनी दिलं उत्तर म्हणाले..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाची दुसरी लाट संपू लागली असली तरीही ओमिक्रॉनचं संकट घोंघावतं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रूग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या रूग्णांची संख्या आता 28 झाली आहे. अशात चर्चा सुरू झाली आहे ती लहान मुलांसाठी लस कधी येणार? 18 वर्षांखालील मुलांना लस कधी मिळणार हा प्रश्न सध्या चर्चेत असतानाच सीरम इन्सिटीट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

एका पत्रकार परिषदेत अदर पूनावाला यांना लहान मुलांसाठी लस कधी येणार हा प्रश्न विचारण्यात आला… त्यावेळी अदर पूनावाला म्हणाले, ‘लहान मुलांसाठी सिरम कोव्हाव्हॅक्स या लसीच्या चाचण्या सुरळीतपणे सुरू आहेत. जर सगळ्या चाचण्या आणि सगळ्या प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्या तर पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी किंवा फेब्रुवारी 2022 मध्ये लहान मुलांसाठी लस येईल. अनेक स्वयंसेवकांना तपासण्यांसाठी लसीचे डोस देण्यात आले आहेत. लसीच्या चाचण्याही व्यवस्थित सुरू आहेत. त्याचा आढावा आम्ही या डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत घेणार आहोत’ असंही अदर पूनावाला यांनी स्पष्ट केलं.

लसीच्या प्रक्रियेबाबत माहिती देताना अदर पूनावाला म्हणाले की, ‘आम्ही जी लस लहान मुलांसाठी आणतो आहोत ती लहान मुलांसाठी किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी आम्हाला तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आम्ही टप्प्याटप्प्याने यावर काम करत आहोत. 12 वर्षांखालील मुलांचाही या चाचण्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आम्हाला असा विश्वास वाटतो आहे की कोव्हाव्हॅक्सला पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत मंजुरी मिळाली असेल. DCGI ला हे करणं योग्य वाटेल तेव्हाच हे घडू शकणार आहे.’ असंही ते म्हणाले.

हे वाचलं का?

PTI ने अदर पूनावाला यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. अदर पूनावाला यांनी दिल्लीत एका इंडस्ट्री कॉन्फरन्समध्ये लहान मुलांच्या लसीच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये लहान मुलांना लस दिली जाते आहे. त्याच पार्श्वभूमीवर अदर पूनावाला म्हणाले की भारतातही लहान मुलांचं म्हणजेच 18 वर्षांच्या खालील मुलांचं लसीकरण सुरू करण्यात यायला हवं. भारतात या वर्षी जानेवारी महिन्यापासून लसीकरणाचे वेगवेगळे टप्पे आले आणि त्यामध्ये लसीकरण करण्यात आलं. आता येणाऱ्या वर्षात लहान मुलांसाठी लसीकरण करण्याची संमती आम्हाला मिळेल अशी आशा आम्हाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT