बहुमत मिळूनही मुख्यमंत्री काही ठरेना, फडणवीसांच्या एंट्रीने गोव्यात नव्या राजकारणाला सुरुवात?
पणजी: गोव्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी गोवेकरांनी भाजपला जवळजवळ अगदी स्पष्ट बहुमत दिलं आहे. पण असं असताना देखील नेहमीप्रमाणेच गोव्यातील जे गोंधळाचं राजकारण पाहायला मिळतं तेच आताही सुरु झालं आहे. खरं म्हणजे यंदाच्या निवडणुका भाजपने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या. पण असं असताना निवडणूक निकालानंतर देखील अद्यापही भाजपने आपला मुख्यमंत्री कोण असेल […]
ADVERTISEMENT
पणजी: गोव्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी गोवेकरांनी भाजपला जवळजवळ अगदी स्पष्ट बहुमत दिलं आहे. पण असं असताना देखील नेहमीप्रमाणेच गोव्यातील जे गोंधळाचं राजकारण पाहायला मिळतं तेच आताही सुरु झालं आहे. खरं म्हणजे यंदाच्या निवडणुका भाजपने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या. पण असं असताना निवडणूक निकालानंतर देखील अद्यापही भाजपने आपला मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवलेलं नाही.
ADVERTISEMENT
गोव्यात आता मुख्यमंत्री पदासाठी विश्वजीत राणे आणि प्रमोद सावंत यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यातही भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या एंट्री गोव्यात राजकारणाला वेगळाच रंग चढला आहे. डॉ. प्रमोद सावंत यांना पक्षातूनच बराच विरोध असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. तर दुसरीकडे भाजपचे गोव्यातील हेविवेट नेते विश्वजीत राणे हे मुख्यमंत्री पदासाठी जोर लावत असल्याचं समजतं आहे.
देवेंद्र फडणवीसांचा कौल ठरणार महत्त्वाचा?
हे वाचलं का?
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गोवा विधानसभेची संपूर्ण जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर फडणवीस यांनीही योग्य रणनिती आखून भाजपला निर्णायक विजय मिळवून दिला. अशावेळी गोव्याचा मुख्यमंत्री ठरविण्यात फडणवीसांची भूमिका हा अत्यंत महत्त्वाची ठरु शकते.
दुसरीकडे गोव्याच्या राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, देवेंद्र फडणवीस हे विश्वजीत राणे यांचा समर्थन करत असल्याचं बोललं जात आहे. त्यातच गेल्या आठवड्यात विश्वजीत राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा देखील झाल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. त्यामुळेच गोव्यात मुख्यमंत्री बदल होईल अशी दाट शक्यता आता वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT
एकीकडे गोव्यात प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वात सत्ता आल्याने ते देखील पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्यामुळे गोव्यातील भाजपमध्ये सध्या प्रचंड गटातटाचं राजकारण पाहायला मिळतंय.
ADVERTISEMENT
विश्वजीत राणेंच्या पत्नी दिव्या राणे यांनी दिलेल्या जाहिरातीतून प्रमोद सावंत गायब
मुख्यमंत्री पदावरून डॉ. प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांच्यातील शीतयुद्ध सध्या जोरदार सुरु आहे. अशातच विश्वजीत राणे यांच्या पत्नी डॉ. दिव्या राणे यांनी आज गोव्यातील स्थानिक वृत्तपत्रात यांनी आज दिलेल्या जाहिरातीत डॉ. प्रमोद सावंत यांचे छायाचित्रच छापण्यात आलेलं नाही.
या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस, तसंच प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे या सगळ्यांचे फोटो छापण्यात आले आहेत. मात्र, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा फोटोच या जाहिरातीत नाही. त्यामुळे गोव्यातील राजकीय वर्तळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
डॉ. दिव्या राणे यांनी गोव्यातील विधानसभा निवडणुकीत पर्यें विधानसभा मतदारसंघातून तब्बल 13,943 मताधिक्याने विजय मिळवला आहे. हा त्यांचा गोव्यातील ऐतिहासिक विजय आहे. कारण गोव्यात एवढ्या मोठ्या मताधिक्याने या निवडणुकीत कुणीही विजय मिळवलेला नाही. त्यामुळेच दिव्या राणे यांनी स्थानिक वृत्तपत्रात पहिल्या पानावर मतदारांचे आभार मानणारी जाहिरात दिली. ज्यामधून प्रमोद सावंत मात्र गायब आहेत.
विश्वजीत राणेंच्या राज्यपाल भेटीने भाजपमध्ये खळबळ
विश्वजीत राणे यांनी काल (12 मार्च) अचानक स्वतंत्रपणे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांची राजभवनात भेट घेतल्याने गोवा भाजपमध्ये एकच खळबळ माजली होती. दरम्यान, या भेटीमुळे सुरु झालेल्या चर्चा लक्षात घेऊन विश्वजीत राणे यांनी तात्काळ खुलासा केला.
‘ही भेट वैयक्तिक होती. मी फक्त राज्यपालांना माझ्या मतदार संघातील कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी भेटलो होतो. ही काही राजकीय भेट नव्हती.’ असं राणे म्हणाले. पण मुख्यमंत्री ठरविण्याच्या धामधुमीत राणेंनी राज्यपालांची घेतलेली भेट ही काही साधीसुधी नसावी अशीच सध्या गोव्यात चर्चा आहे.
दुसरीकडे गोव्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या केंद्रीय स्तरावरून गोव्यातील भाजपच्या नेत्यांना कोणत्याही सूचना अद्याप देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गोव्यात मुख्यमंत्रीपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत संभ्रम कायम आहे.
निवडणूकीत भाजपविरुद्ध उतरलेल्या मगो पक्षाने का दिला भाजपला पाठींबा? सुदीन ढवळीकर म्हणतात…
गोव्याच्या आमदारांचा 15 मार्चला होणार शपथविधी
गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी नवीन आमदारांना शपथ घेण्यासाठी 15 मार्च रोजी राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे.
या संदर्भात जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात असेही म्हटले आहे की, आमदार-निर्वाचित गणेश गावकर यांना राज्यपाल 14 मार्च रोजी प्रो-टेम स्पीकर म्हणून शपथ देतील आणि त्यानंतर इतर आमदारांसाठी शपथविधी सोहळा आयोजित करतील.
गोवा विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं आणि 10 मार्च रोजी निकाल जाहीर झाले होते. यावेळी 40 सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने 20 जागा जिंकल्या आहेत.
या निकालानंतर तीन अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने देखील भाजपला कोणत्याही अटी शर्थींशिवाय पाठिंबा जाहीर केला आहे. पण मगोपचा पाठिंबा भाजपने घेऊ नये यासाठी भाजपच्या अनेक आमदारांनी विरोध केला आहे. त्यावरुन देखील पक्षात बरेच मतभेद असल्याचं समजतं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT