या मायाजालात पडू नका ! MPSC उत्तीर्ण झालेल्या तरुणाची पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यातभरात MPSC ची परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळेल यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांची संख्या ही लाखांच्या घरात आहे. मात्र कोरोना कालावधीत या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. MPSC परीक्षा पास होऊन नोकरी मिळत नसल्यामुळे निराश झालेल्या पुण्यातील एका तरुणाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे.

ADVERTISEMENT

स्वप्नील लोणकर असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने पुण्यातील फुरसुंगी येथील घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. मृत्यूपूर्वी लिहीलेल्या सुसाईड नोटमुळे स्वप्नीलने नोकरी मिळत नसल्यामुळे होत असलेल्या त्रासाची कहाणी सांगितली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नीलच्या वडिलांची हडपसर भागात प्रिंटींग प्रेस आहे. त्याचे आई-बाबा या ठिकाणी कामाला जातात.

बुधवारी आई-बाबा कामावर गेल्यानंतर स्वप्नीलची बहिणही काही कामानिमीत्त घराबाहेर गेली होती. दुपारी घरी आल्यानंतर स्वप्नील घरात कुठेच दिसत नाही म्हणून त्याच्या रुममध्ये गेले असता त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत सापडला. बहिणीने या घटनेची माहिती आपल्या आई-वडिलांना कळवली. शेजारच्यांच्या मदतीने स्वप्नीलला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

हे वाचलं का?

आपल्या सुसाईड नोटमध्ये काय म्हणतोय स्वप्नील लोणकर?

MPSC हे मायजाल आहे यात पडू नका ! येणार्‍या प्रत्येक दिवसा सोबत वय आणि ओझं वाढत जातं. Confidence तळाला पोहोचतो आणि self doubt वाढत जातो. 2 वर्षे झालेत pass out होऊन आणि 24 वय संपत आलंय, घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेल कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! करोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या. तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगल असतं. हवं ते ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये. फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता. नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस मनात होती. पण काही तरी चांगल होईल, या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे आयुष्य continue होऊ शकेल, असं काहीच उरलं नाहीये. यांस कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी निर्णय आहे. मला माफ करा! 100 जीव वाचवायचे होते, मला डोनेशन करून, 72 राहीले….जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचावा, अनेक जीव वाचतील.

स्वप्नील लोणकर

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT