फडणवीसांनी टाकला दुसरा ‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’; काय आहे लांबे आणि खान यांच्यातील कथित संवाद?
अर्थसंकल्पावर भाष्य केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात दुसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला. पोलिसांच्या बदल्यांचं रॅकेट आपण बघितलंत. महाकत्तलखाना आपण बघितलात. आता हा जो पेन ड्राईव्ह आहे. यामध्ये दोन पात्र आहेत. एक आहेत अर्शद खान आणि दुसरे आहेत मुद्दशीर लांबे, असं म्हणत फडणवीसांनी सभागृहात त्यांच्यातील कथित संवाद ऐकवला. फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखवलेला डॉ. […]
ADVERTISEMENT
अर्थसंकल्पावर भाष्य केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात दुसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला. पोलिसांच्या बदल्यांचं रॅकेट आपण बघितलंत. महाकत्तलखाना आपण बघितलात. आता हा जो पेन ड्राईव्ह आहे. यामध्ये दोन पात्र आहेत. एक आहेत अर्शद खान आणि दुसरे आहेत मुद्दशीर लांबे, असं म्हणत फडणवीसांनी सभागृहात त्यांच्यातील कथित संवाद ऐकवला.
ADVERTISEMENT
फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखवलेला डॉ. लांबे आणि खान यांच्यातील कथित संवाद असा… (कंसात मूळ हिंदी संवाद )
पात्र दोन आहेत. एक आहेत, मोहम्मद अर्शद खान आणि दुसरे आहेत डॉ. मुद्दशीर लांबे.
संवाद : सलामवालेकूम
हे वाचलं का?
डॉ. लांबे : माझी अडचण माहिती आहे का? माझे सासरे दाऊदचे राईट हॅण्ड होते. सुरूवातीला माझं नातं हसिना आपाने (मोठी बहिण अशा अर्थाने) जुळवून आणलं होतं. माझ्याकडून सोहेल भाई होते आणि तिकडून हसिना आपा होत्या. हसिना आपा होत्या. हसिना आपा म्हणजे दाऊदची बहीण. हसिना आपा आणि सोबतच इक्बाल कासकरची पत्नी. म्हणजे दाऊदची वहिनी. थोडं काही झालं की तिथंपर्यंत ते कळतं. (मेरा प्रॉब्लेम क्या है मालूम… मेरे ससूर दाऊद कें राईट हँड थे पहले और मेरा रिश्ता जो हसिना आपा ने कराई थी. मेरे तरफ से सोहेल भाई थे और वहाँ सें हसिना आपा थी. हसिना आपा याने दारुद की बहन. हसिना आपा और साथ में इक्बाल कासकर की वाईफ. याने दाऊद की भाभी. जरा भी कुछ हुआ तो बात वहाँ तक पहुँचती है.)
अर्शद खान : तू त्यांच्यासोबत अन्वरचं नाव ऐकलंच असेल, ते माझे काका आहेत. तेही त्यांच्यासोबतच राहत होते. म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच. अलिकडेच त्यांचं निधन झालं. (तुमने उनके साथ अन्वर का नाम तो सुना होगा. वो मेरे चाचा है. वो भी उनके साथ ही रहते थे. मतलब स्टार्ट सें रहते थे. अभी इंतकाल हुआ उनका.)
ADVERTISEMENT
डॉ. लांबे : माझे सासरे पूर्ण कोकण पट्टा सांभाळतात. ब्लॅक बेल्ट होते आणि संपूर्ण तेच पाहायचे. (मेरा ससूर पुरा कोकण बेल्ट संभालते थे, ब्लॅक बेल्ट थे और पुरा वही संभालते.)
ADVERTISEMENT
अर्शद खान : अच्छा. मुंबईमध्ये माझे काका होते आणि तेच सर्व पाहायचे. तेव्हा मी मदनपुरात होतो. माझा जन्म भेंडी बाजार येथे झालेला आहे. (अच्छा. बॉम्बे में मेरे चाचा थे और पुरा संभालते थे. जब मै मदनपुरा में था. भेंडी बाजार में मेरी पैदाईश है.)
डॉ. लांबे : माझ्या घरात काहीही घडलं की, ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं. सर्व हकिकत सोहेल भाईपर्यंत पोहोचते. आता मागील चार-पाच दिवसांपासून माझ्या घरात वाद सुरू आहे. स्वतःचा जीव दिल्यासारखाचं. (मेरे घर में कोई मसला होता है तो वहाँ तक पहुचता है. सिधी बात सोहेल भाई तक पहुंचती है. अभी चार-पास दिन सें मेंरे घर में मसला चल रहा है. लगता है की, अपनी आप की जान देने जैसा है.)
अर्शद खान : म्हणूनच मी नक्की काय घडलंय असं विचारलं होतं, तर बोलली काही नाही, असंच वैयक्तिक आहे. (इसलिए मैने पुछा सही सही तेरी कहानी क्या, तो बोली कुछ नही मेरा अपना टेंशन है.)
डॉ. लांबे : अर्शद मी तर म्हणतो की, तू आताच वक्फची कामं सुरू कर. आता आपल्याकडे सत्ता आहे. आता तू पाहिजे तितके पैसे कमवू शकतो. पुर्ण वक्फची कामं सुरू कर. कमवण्यासाठी सेंटिंग कर. तुझे अर्धे पैसे माझे अर्धे पैसे. (अर्शद मै तो बोलता हु की, तुम अभी तुम अभी वकफ के काम पकडो. अभी अपने पास पॉवर है. अभी तुम चाहे जितना पैसा कमा सकते हो. पुरे वकफ के काम शुरू करो. कमाने का सेंटिंग करो. तुम्हारा आधा और मेरा आधा)
अर्शद खान : लवकरच मी यासंदर्भात विचार करतो आणि तुझ्यासोबतही या सर्व बाबीत चर्चा करेन. माझा एक माणूस घेऊन येतो आणि काम मिळवतो. (अभी मै बैठुंगा और तुमसे पर्सनली ये सब चीज में बैठुंगा. अपना एक बंदा ले के आऊंगा और काम पकडुंगा.)
डॉ. लांबे : माझ्याकडे माहिममध्ये कसं होतं माहितीये का, माझ्यासोबत काही झालं तर सगळे लोक सोबत येतात. (मेरे माहीम में कैसा होता मालूम है क्या, मेरे साथ क्या हुआ तो पुरे लोग साथ में आते है.)
अर्शद खान: अर्शदच्या नावाने बिल्डिंग घे. अर्शद माझ्या विश्वासातील माणूस आहे. कधीही बदलणार नाही. (अर्शद के नाम सें बिल्डींग ले. अर्शद मेरा भरोसे का आदमी है. कई पलटी नही मारेगा.)
डॉ. लांबे : तुझ्यावर चौकशी लागू शकते, पण माझी चौकशी होऊ शकत नाही. (तुम्हारे उपर इनक्वायरी बैठ सकती है, लेकिन मेरे पर नही बैठ सकती.)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT