शरद पवार जातीयवादीच! आंबेडकर जयंतीच्या दिवशीच देवेंद्र फडणवीसांचा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

आज आंबेडकर जयंती आहे. त्याचा उत्साह राज्यभरात दिसून येतो आहे. अशात शरद पवार हेच कसे जातीयवादी आहेत? त्यांचं निधर्मीपण कसं बेगडी आहे या सगळ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर हल्ला केला आहे. १२ ते १३ ट्विट करून त्यांनी शरद पवारांवर टीकेचे ताशेरे झोडले आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणतात, आपण आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो आहोत. त्यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० चा विरोध केला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही कलम ३७० मागे घेतल्याचं स्वागत केलं होतं. मात्र शरद पवार म्हणाले होते की पक्षातलं एकाचं मत ही पक्षाची भूमिका होऊ शकत नाही.

हे वाचलं का?

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केल्याप्रकरणी आणि मनी लाँड्रींग प्रकरणी ईडीने अटक केली तेव्हा शरद पवार म्हणाले होते की नवाब मलिक मुस्लिम असल्यानेच त्यांचा संबंध दाऊदशी जोडण्यात आला. तसं करणं खूप सोपं आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी नुकतंच केलं होतं.

२०१३ मध्ये शरद पवार म्हणाले होते की इशरत जहाँ ही निष्पाप मुलगी होती. शरद पवार हे तेव्हा केंद्रात मंत्री होते त्यांना या प्रकरणाबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा इशरत जहाँ ही निष्पाप आणि कॉलेजला जाणारी मुलगी होती असं वक्तव्य त्यांनी केलं होतं याचीही आठवण फडणवीसांनी करून दिली आहे.

ADVERTISEMENT

२०१२ मध्ये जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात होती त्याचवेळी रझा अकादमीचा मोर्चा आझाद मैदानात निघाला होता. त्या ठिकाणी हिंसाचार घडला होता जो महाराष्ट्राने पाहिला होता. त्यावेळी हुतात्मा चौकात असलेल्या अमर जवान ज्योतीची तोडफोड करण्यात आली होती

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना मुस्लिमांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याची तरतूद केली होती. मात्र प्रत्यक्षात त्याचं पुढे काहीही झालं नाही. ती फक्त मतं खिशात घालण्याची शक्कल होती असाही आरोप फडणवीस यांनी केला आहे.

मतदान झालं की त्यात कुणाला पाडायचं आणि कुणाला जिंकवायचं हे अल्पसंख्याक समुदाय ठरवतो असंही वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं अशी टीकाही फडणवीस यांनी केली होती.

हिंदू दहशतवाद हा शब्द २००८ मध्ये पहिल्यांदा शरद पवार यांनी वापरला होता. त्यावेळी साध्वी प्रज्ञा यांना अटक झाली होती. शरद पवारांनी या शब्दाचा प्रयोग केल्यानंतर पी चिदंबरम आणि सुशीलकुमार शिंदे यांनीही या शब्दाचा प्रयोग केला होता.

१२ मार्च १९९३ ला मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. १२ स्फोट झाले त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांनी १३ स्फोट झाले असं धडधडीत असत्य कथन केलं. १२ ठिकाणी जे स्फोट झाले ती सगळी हिंदू लोकवस्तीतली ठिकाणं होती. मात्र शरद पवारांनी १३ वा ब्लास्ट हा मुस्लिम भागात झाल्याचं खोटं सांगितलं असाही आरोप त्यावेळी दिलेल्या बातमीचा संदर्भ देत फडणवीसांनी केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT