Omicron पाठ सोडत नाही… त्यातच आता नवा व्हेरिएंट DELMICRON ही आला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जगभरात डेल्टानंतर आता कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनचे व्हेरिएंटचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. भारतात, केंद्र सरकारने राज्यांना प्रत्येक स्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अंदाज लावला जात आहे की, 2022 मध्येही कोरोना महामारीपासून मुक्तता मिळणार नाही. कारण ओमिक्रॉननंतर आता आणखी एक नवा व्हेरिएंट समोर आला असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

ADVERTISEMENT

नव्यानेच आलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटशी अवघं जग झगडत आहे. अशातच आता कोरोनाचा आता आणखी एक व्हेरिएंट ‘डेल्मिक्रॉन’ (Delmicron)ने सर्वांची चिंता वाढवली आहे. वास्तविक, मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, युरोप आणि अमेरिकेतील केसेस वाढण्यामागे Delmicron व्हेरिएंट जबाबदार आहे.

काय आहे Delmicron व्हेरिएंट?

हे वाचलं का?

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या म्युटेशनने नवा व्हेरिएंट Delmicron हा नवीन व्हेरिएंट तयार झाला आहे. या व्हेरिएंटने अमेरिका आणि युरोपमध्ये अक्षरश: कहर निर्माण केला आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

ADVERTISEMENT

‘आज तक’ने एम्सचे (AIIMS) प्राध्यापक डॉ. संजय राय यांच्याशी याबद्दल बोलले असता, त्यांनी सांगितले की डेल्टा आणि ओमिक्रॉन यांनी मिळून डेल्मिक्रॉन व्हेरिएंट बनवल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. आतापर्यंत मिळालेल्या डेटावरून Omicron हा व्हेरिएंट समोर आला आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की, हा व्हेरिएंट खूप संसर्गजन्य आहे.

ADVERTISEMENT

ते पुढे असंही म्हणाले की, कोरोनाचा व्हेरिएंट सातत्याने म्युटेशन बदलत असते. अशा परिस्थितीत, दोन किंवा अधिक व्हेरिएंट एकत्र करून नवीन व्हेरिएंट तयार करू शकतात. आतापर्यंत 30 हून अधिक म्युटेशन समोर आले आहेत.

डॉ. संजय राय यांनी असेही सांगितले की, हा व्हेरिएंट किती धोकादायक असू शकतो हे आम्ही आतापासून सांगू शकत नाही. यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कोरोनाचा कोणता व्हेरिएंट हा आधीच्या व्हेरियंटपेक्षा जास्त घातक ठरू शकतो हे येणारा काळच सांगेल.

मुलांना लसीकरणाची गरज नाही- डॉ संजय राय

भारत सरकारच्या NTAGI समितीने नुकतीच शिफारस केली आहे की, देशातील मुलांना लसीची गरज नाही. याबाबत ‘आज तक’ने एम्समधील ‘कोव्हॅक्सीन’च्या चाचणीचे प्रमुख तपासनीस संजय राय यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की मुलांमध्ये लसीकरणाची गरज नाही.

संजय राय म्हणाले, कोरोनामुळे मुलांच्य मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. जेव्हा आपण प्रौढांबद्दल बोलतो, तेव्हा लसीकरणाशिवाय 45 वर्षांवरील कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.5% आहे. म्हणजेच कोरोनामुळे 1 लाखांवर 15 हजार लोकांचा मृत्यू होत आहे. आम्ही लसीकरणाद्वारे यापैकी 80-90% लोकांना वाचवू शकतो. तथापि, लसीच्या दुष्परिणामांमुळे दर 1 दशलक्षमागे 10-15 लोकांचा मृत्यू होत आहे. म्हणजेच 13-14000 लोकांचे प्राण वाचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.

राज्यात रात्रीचा लॉकडाउन लागणार?; मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्सशी झाली चर्चा, आज निघणार आदेश

मात्र, मुलांचा विचार केला तर कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण फक्त 2 आहे. अशा परिस्थितीत जर आपण लहान मुलांमध्ये लसीकरण केले आणि 10-15 मुले दुष्परिणामांमुळे दगावली, तर आपण लसीकरण न केलेलेच बरे. म्हणजेच सरकार कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व पैलूंची चौकशी करेल. त्यामुळे मला वाटते की मुलांमध्ये लसीकरणाची गरज नाही. लसीकरणामुळे काही बालकांचे मृत्यू होत असतील तर त्याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT