Dasara Melava: “बाळासाहेबांचा विचार मोडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा लाज वाटली नाही का?”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बाळासाहेबांचा विचार मोडून जेव्हा तुम्ही (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा लाज वाटली नाही का? असा सवाल आज एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना बीकेसीतल्या दसरा मेळाव्यात विचारला. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार मोडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांना लाज वाटली नाही का? असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी?

उद्धव ठाकरे मला काय म्हणाले कटप्पा? पण कटप्पाही स्वाभिमानी होता. तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता. आणखी काय म्हणाले.. शिवसैनिकांना त्रास देत आहोत. कुठल्या शिवसैनिकांना? आम्ही समोरून वार करणारे आहोत तुमच्यासारखे पाठीत खंजीर खुपसणारे नाहीत. तुमच्या काळात जे काही शिवसैनिकांसोबत झालं ते पाहिलं का? हे सरकार कुणावरही अन्याय करणारं नाही. आम्हाला कुणावरही अन्याय करून पक्षात घ्यायचं नाही. असल्या गोष्टी तुम्ही केल्या आम्ही नाही.

निष्ठावंत कोण आहे महाराष्ट्राला कळलं आहे

आमदारकी खासदारकी दिली ते लोक सोडून गेले. निष्ठावंत शिवसैनिकांनी सांगावं की पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यावा, अरे आता राहिलेत किती? येतील सगळे अनेकांना गोष्टी कळत आहेत. जे भावनिक ब्लॅकमेलिंग आहे ते आता चालणार नाही. कोथळा काढणार काहीतरी म्हणाले वाटतं, पण त्याआधी पोटाची खळगी भरायला शिका. कोथळा जाऊदे कुणाला एक चापट तरी मारली आहे का? ज्यांच्यावर शेकडो केसेस आहेत त्यांना बोलायचा अधिकार आहे. एकनाथ शिंदेवर १०० पेक्षा जास्त केसेस आहेत.किती केसेस तुमच्यावर आहेत सांगा?

हे वाचलं का?

माझ्या नातवावर टीका करता? किती खालच्या पातळीवर जाणार?

ज्यांनी तुमच्यासाठी केसेस अंगावर घेतल्या त्यांना गद्दार म्हणता? कुठे फेडणार हे पाप? मी मुख्यमंत्री माझ्या मुलाला कार्टं म्हणजे श्रीकांतबाबत उद्धव ठाकरे असं बोलले आणि नातू नगरसेवक अशी टीका ठाकरेंनी केली. एवढा बच्चू दीड वर्षांचा आहे. त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं (उद्धव ठाकरे) अधःपतन सुरू झालं. कुणावर टीका करता?दीड वर्षांच्या बाळावर. तुम्ही मुख्यमंत्री झाले तुमचा मुलगा मंत्री झाला आम्ही काही बोललो? एक ग्रामीण भागातला माणूस मंत्री झाला असता ना.. काहीही बोलायचं, कुठल्या लेव्हलवर जाऊन टीका करत आहात? पायाखालची वाळू सरकली आहे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना लाज वाटली नाही का?

मी जास्त काही बोलत नाही थोडं बाकी ठेवतो. भाजपने खंजीर खुपसला म्हणून महाविकास आघाडी केली. महाविकास आघाडी केली तेव्हा मंत्री म्हणून शपथ का घेतली ? तेव्हा लाज वाटली नाही का? असं आम्हाला उद्धव ठाकरे विचारत आहेत. लाज तर तुम्हाला वाटायला पाहिजे होती. बाळासाहेबांचे विचार मोडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. छातीवर दगड ठेवून मी तुमच्यासोबत राहिलो. लाज तुम्हाला वाटली पाहिजे. बाळासाहेब असते तर त्यांनी काय केलं असतं? नारायण राणे बोलले बाळासाहेब असते तर हा (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्री झालाच नसता. नारायण राणेंना मुख्यमंत्री त्यांनी केलं. यापुढचं मी बोलत नाही. तुमचीच लायकी तुम्ही काढून घेतला.

ADVERTISEMENT

मला कसलाही मोह नाही

पक्षप्रमुख होण्यासाठी डाव खेळतोय असंही उद्धव ठाकरे म्हणाले.. अरे या एकनाथ शिंदेला काहीही मोह नाही. या एकनाथ शिंदेला मुख्यमंत्रीही व्हायचं नव्हत. मी अजून वर्षा बंगल्यावर राहायलाही गेलो नाही. तुम्ही माझ्याबद्दल बोलताय का? देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री म्हणाले तेव्हा मला म्हणाले होते की एकनाथ शिंदेसारखा कार्यकर्ता उद्धव ठाकरेंना भेटला आहे. पण त्यांना किंमत नाही. मी माझं काम करतो आहे. असं मी तेव्हा फडणवीसांना म्हणालो.

ADVERTISEMENT

आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहोत

स्वतःच्या वडिलांचं नाव घ्यायची धमक नाही असं उद्धव ठाकरे मला उद्देशून म्हणाले, त्यांना सांगू इच्छितो हा एकनाथ संभाजी शिंदे आहे. माझ्या वडिलांबाबत तुम्हाला सांगू इच्छितो. मी जेव्हा पहाटे ३-४ ला घरी जायचो तेव्हा माझे वडील झोपलेले असायचे. कितीतरी दिवस मी माझ्या कुटुंबीयांना भेटलो नव्हतो. माझ्या आई वडिलांनी त्याग केला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब माझ्यासोबत होते म्हणून मी उभा आहे. त्याची तुम्ही टिंगल करता आहात? माझ्या वडिलांचं नाव कशा घेताय असं ते म्हणाले? आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेतो आहोत. छत्रपती शिवरायांचं नाव कुठल्या अधिकारात घेता? तुम्ही तुमच्या वडिलांच्या प्रॉपर्टीचे वारसदार असाल आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत असंही एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT