का आहेत आपल्या साध्या फटाक्यांपेक्षा ‘हे’ ग्रीन फटाके एवढे वेगळे?
दिवाळी आणि फटाके ही परंपरा फार जुनी आहे. त्यामुळे दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी नेहमीच पाहायला मिळते. दरम्यान, असं असलं तरीही गेल्या काही वर्षांपासून तीव्र आवाजाचे फटाके आणि प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. वाढत्या प्रदूषणाच्या भीतीने अनेक राज्यात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. काही राज्यांमध्ये ग्रीन फटाके विकण्यास मात्र परवानगी देण्यात आली आहे. नेचर […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
दिवाळी आणि फटाके ही परंपरा फार जुनी आहे. त्यामुळे दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी नेहमीच पाहायला मिळते.
हे वाचलं का?
दरम्यान, असं असलं तरीही गेल्या काही वर्षांपासून तीव्र आवाजाचे फटाके आणि प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांना परवानगी देण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT
वाढत्या प्रदूषणाच्या भीतीने अनेक राज्यात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
काही राज्यांमध्ये ग्रीन फटाके विकण्यास मात्र परवानगी देण्यात आली आहे. नेचर फ्रेंडली ग्रीन फटाके हे आपल्या साध्या फटाक्यांपेक्षा तुलनेने कमी प्रदूषण पसरवितात.
ग्रीन फटाके हे फक्त आकारानेच छोटे नसतात तर ते बनविण्यासाठी कच्चा माल देखील कमी लागतो.
ग्रीन फटाक्यांमध्ये पार्टिक्यूलेट मॅटरकडे विशेष लक्ष दिलेले असते. जेणेकरुन फटाका फुटल्यानंतर कमीत कमी प्रदूषण व्हावं.
ग्रीन फटाक्यांमध्ये कमीत कमी 20 टक्के पार्टिक्यूलेट मॅटर बाहेर पडतं ज्यामुळे फक्त 10 टक्के गॅस उत्सर्जित होतो.
हा गॅस फटाक्यांच्या संरचनेवर आधारित असतो. ग्रीन फटाक्यांच्या बॉक्सवर असलेल्या क्यूआर कोडला NEERI नावाच्या अॅपमधून आपण स्कॅन करुन त्याची माहिती मिळवू शकता.
फटाक्यांमधून बाहेर पडणारे पार्टिक्यूलेट मॅटर शरीराच्या आत जातात आणि हा विषारी वायू फुफ्फुसांमध्ये अडकून राहतो.
हृदयविकार आणि अस्थमा यासारख्या आजारांशी झगडणाऱ्यांसाठी हे फटाक्यांचा धूर हा खूपच धोकादायक ठरु शकतो.
ओडिशा सरकारने तर दिवाळीच्या या सणात फटाक्यांचा विक्रीवरच बंदी आणली आहे.
दिल्लीच्या प्रदूषण नियंत्रण समितीने देखील 1 जानेवारी 2022 पर्यंत फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे.
याआधी सुप्रीम कोर्टाने एनजीटीच्या त्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. ज्यामध्ये कोव्हिड-19 रोगाच्या दरम्यान त्या परिसरात फटाक्यांची विक्री आणि त्याच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय देण्यात आला होता.
दुसरीकडे राजस्थान सरकारने देखील फक्त ग्रीन फटाक्यांच्या विक्रीला परवानगी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT