कुत्रीसह पिल्लाला झाडाला लटकवत दिली फाशी, उल्हासनगरमधली धक्कादायक घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उल्हासनगर शहरात माणूसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुत्रीला तिच्या पिल्लासह झाडाला लटकवून फाशी देण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात उल्हासनगरच्या हिललाईन पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर ५ भागात, साईनाथ कॉलनी परिसरात People for Animal संस्थेच्या प्राणीमित्र सृष्टी यांना या घटनेबद्दल माहिती मिळाली. त्यांनी या भागात जाऊन शोध घेतला असता कुत्रीचा तिच्या पिल्लासोबतचा मृतदेह आढळून आला.

या घटनेनंतर कुत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ज्यानंतर सृष्टीने हिललाईन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत असून या कुत्री आणि तिच्या पिल्लाला ज्या पद्धतीने निर्दयीपणे मारण्यात आलं त्यावरुन शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT