धक्कादायक! मृतदेहाजवळ जाऊन इतर रूग्णांना उपचार देण्याची डॉक्टरांवर आली वेळ
राज्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन तसंच बेड्सची कमतरता जाणवत असल्याने रूग्ण आणि त्यांच्या नातवाईकांना त्रास सहन करावा लागतोय. फक्त रूग्णचं नाही तर डॉक्टरांना देखील याचा सर्व परिस्थितीचा सामना करावा लागतो. बारामतीमध्ये एका सरकारी रूग्णालयात बेड उपलब्ध न झाल्यामुळे डॉक्टरला मृतदेहाजवळ असलेल्या रूग्णावर उपचार करावे लागले आहेत. बारामतीत कोरोनाने थैमान घातलं आहे. परिस्थिती […]
ADVERTISEMENT
राज्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन तसंच बेड्सची कमतरता जाणवत असल्याने रूग्ण आणि त्यांच्या नातवाईकांना त्रास सहन करावा लागतोय. फक्त रूग्णचं नाही तर डॉक्टरांना देखील याचा सर्व परिस्थितीचा सामना करावा लागतो. बारामतीमध्ये एका सरकारी रूग्णालयात बेड उपलब्ध न झाल्यामुळे डॉक्टरला मृतदेहाजवळ असलेल्या रूग्णावर उपचार करावे लागले आहेत.
ADVERTISEMENT
बारामतीत कोरोनाने थैमान घातलं आहे. परिस्थिती चिंताजनक असताना देखील डॉक्टरांनी मात्र त्यांची हिम्मत सोडली नाही. कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही डॉक्टर इतर रुग्णांना जीवदान देण्यासाठी सतत प्रयत्न करतायत. नुकतंच बारामती सिल्वर ज्युबिली रूग्णालयात एका मृतदेहाजवळ असलेल्या दोन रूग्णांना डॉ. सदानंद काळे आणि त्यांच्या टीमने उपचार दिले आहेत. रूग्ण वाढत असल्याने तसंच रूग्णांना बेड्स उपलब्ध नसल्याने डॉक्टरांवर देखील अशी वेळ आली आहे.
कोरोनावरच्या ‘बारामती पॅटर्न’ औषधाची आंतराराष्ट्रीय पातळीवर दखल
हे वाचलं का?
बारामतीमध्ये 311 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची नोंद करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 15476 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचं आढळलंय. यापैकी 11514 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या सक्रिय रूग्णांची संख्या 4000 पेक्षा जास्त असून आतापर्यंत 280 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
चंद्रपूर- वेळीच बेड न मिळाल्यामुळे रूग्णालयाजवळच्या झाडाखाली रूग्णाने सोडले प्राण
ADVERTISEMENT
बारामतीत कोरोनामुळे परिस्थिती गंभीर होत असून उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला बैठक घेत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जातात. रूग्णांच्या सेवेत कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातायत. डॉक्टरांनी देखील हार न मानता त्यांचं कर्तव्य सुरुच ठेवलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT