बनावट कागदपत्रांच्या आधारे स्टेट बँकेला १४ कोटींचा चुना, पोलिसांनी १५ जणांना केली अटक
मालमत्तेचं जास्त मुल्यांकन करुन कर्ज वाटप करुन बँकेला गंडा घालणाऱ्यांना चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये बँकेचे तीन अधिकारी, एक एजंट आणि ११ कर्जधारकांचा समावेश आहे. काय आहे हा नेमका प्रकार? चंद्रपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बँकेतील काही अधिकाऱ्यांनी एजंटशी संगनमत करत, […]
ADVERTISEMENT
मालमत्तेचं जास्त मुल्यांकन करुन कर्ज वाटप करुन बँकेला गंडा घालणाऱ्यांना चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये बँकेचे तीन अधिकारी, एक एजंट आणि ११ कर्जधारकांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
काय आहे हा नेमका प्रकार?
चंद्रपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बँकेतील काही अधिकाऱ्यांनी एजंटशी संगनमत करत, बनावट आयकर परतावा तयार करुन मालमत्तांचं जास्त मुल्यांकन करुन ४४ प्रकरणांमध्ये कर्ज वाटप केली होती. ४४ प्रकरणांमध्ये मिळून बँकेने १४ कोटी २६ लाखांचं कर्ज वाटप केलं होतं. हे सर्व कर्ज NPA झाल्यानंतर स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे याची तक्रार दाखल केली होती.
हे वाचलं का?
या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात शाखा व्यवस्थापक देविदास कुलकर्णी, कर्ज प्रक्रीया अधिकारी विनोद लाटेलवार आणि पंकजसिंह सोळंकी यांना अटक केली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारावर ज्यांना कर्जवाटप केलं ते सर्वजण गरीब घरातले असल्याचं समोर आलं आहे.
त्यामुळे या लोकांच्या नावाने देण्यात आलेली कर्जाची रक्कम ही शहरातील प्रॉपर्टी डिलर्सनी हडप केल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे. या प्रकरणात बँकेचे आणखी काही अधिकारी सहभागी असण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत पोलीस आपल्या कारवाईचा मोर्चा प्रॉपर्टी डिलर्स आणि बिल्डरांकडे वळवणार असल्याचं समजल्यामुळे चंद्रपूरच्या बिल्डर लॉबीत खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT