कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनानंतर निवडणूक आयोगाने या जागेसाठीची पोटनिवडणुक जाहीर केली आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने चार राज्यांतील पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. ज्यात पश्चिम बंगालमधील दोन, छत्तीसगड, बिहार आणि महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. या निवडणुकीची अधिसूचना १७ मार्चला जाहीर केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २४ मार्चपर्यंत […]
ADVERTISEMENT
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनानंतर निवडणूक आयोगाने या जागेसाठीची पोटनिवडणुक जाहीर केली आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने चार राज्यांतील पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. ज्यात पश्चिम बंगालमधील दोन, छत्तीसगड, बिहार आणि महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
या निवडणुकीची अधिसूचना १७ मार्चला जाहीर केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २४ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्जाची छाननी २५ मार्चला होणार असून १२ एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर चार दिवसांनी म्हणजेच १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. असे निवडणूक आयोगाच्या पत्रकात म्हटले आहे.
Election Commission announces date for bye polls in West Bengal, Chhatisgarh, Bihar & Maharashtra pic.twitter.com/WqMELdk02W
— ANI (@ANI) March 12, 2022
चंद्रकांत जाधव यांनी २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता. जाधव यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती, ज्यातून ते बरे झाले होते. परंतू यानंतर त्यांची पुन्हा तब्येत बिघडली होती. यानंतर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचं निधन झालं.
हे वाचलं का?
काही महिन्यांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाधव यांच्या पत्नीला भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. परंतू ती नाकारुन जाधव यांच्या पत्नीने काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच पक्षाने आदेश दिल्यानंतर पुन्हा निवडणुक लढण्यासाठी तयार असल्याचं शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं होतं.
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची निवडणुक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत असताना सतेज पाटील यांनी या विषयाशी संबंधित देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाकडे पुन्हा एकदा राज्याचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT