Ekadashi: एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या मंदिरात डोळे दिपवणारी आकर्षक सजावट
पुत्रदा एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. आज (18 ऑगस्ट) पुत्रदा एकादशी असल्याने पंढरपूर मधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विशेष अशी सजावट करण्यात आली आहे. ही सजावट अत्यंत मनमोहक अशा फुलांनी करण्यात आली आहे. देवाचा गाभारा, सोळाखांभी मंडप, चौखांभी मंडप हे सगळं आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलं आहे. या सजावटीसाठी खास […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
पुत्रदा एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.
हे वाचलं का?
आज (18 ऑगस्ट) पुत्रदा एकादशी असल्याने पंढरपूर मधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विशेष अशी सजावट करण्यात आली आहे. ही सजावट अत्यंत मनमोहक अशा फुलांनी करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
देवाचा गाभारा, सोळाखांभी मंडप, चौखांभी मंडप हे सगळं आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलं आहे. या सजावटीसाठी खास वेगळ्या फुलांचा वापर करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
यावेळी पांडुरंगाला लाल रंगाचा अंगरखा, पितांबर, डोक्यावर खास पागोटे व गळ्यात फुलांच्या माळा, भाळी चंदनाचा टिळा लावल्याने श्री विठ्ठलाचे रूप अधिक खुलून दिसत आहे.
पुत्रदा एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली#Pandharpur #Vitthal #विठ्ठल #जयहरी pic.twitter.com/0aQ2dUhtVT
— Mumbai Tak (@mumbaitak) August 18, 2021
दुसरीकडे रुक्मिणी मातेच्या मूर्तीची देखील विशेष अशी सजावट करण्यात आली आहे. मळवट भरलेली रुक्मिणी मातेची मूर्ती ही फारच विलोभनीय दिसत आहे.
फुलांच्या या विशेष सजावटीसाठी शेवंती, झेंडू, अस्टर, अॅथोलियम, कार्नेशन, गुलाब, मोगरा, तुळस, जेप्सोफेलिया या खास फुलांचा वापर करण्यात आलेला आहे.
एकादशीनिमित्त करण्यात आलेली फुलांची ही सजावट पुण्याचे भक्त नानासाहेब पाचुंदकर यांच्या वतीने करण्यात आलेली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT