महाराष्ट्रात सफरचंदाची शेती ! पाहा कोणत्या भागात शेतकऱ्यांनी करुन दाखवली कमाल

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या साताऱ्याच्या पाचगणीत आता शेतकरी सफरचंदाची शेती करायला लागले आहेत. भारतात सफरचंदाची शेती ही मुख्यत्वे जम्मू-काश्मीर, सिमला, हिमाचल प्रदेश, कुलू-मनाली अशा थंड हवेच्या ठिकाणी होते. परंतू महाराष्ट्रात थंड हवेच्या ठिकाणीही आता काश्मीरी सफरचंदांचे मळे पिकायला लागले आहेत. पाचगणी भागातील राजपुरी, खिंगर, अमरळ, गोडवली या गावांत सफरचंदांची ६०० झालं लावण्यात आली असून त्याला गोड आणि रसरशीत फळंही आली आहेत.

ADVERTISEMENT

या भागात राहणारे स्थानिक शेतकरी नारायण दुधाने, संजय दुधाने आणि सलीम अलजी यांनी सफरचंदाच्या शेतीची लागवड करायला सुरुवात केली आहे. ज्याला आता चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.

हे वाचलं का?

पाचगणी हे ठिकाण महाराष्ट्रात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. उंच डोंगररांगामुळे या भागात पाऊस आणि हिवाळ्यात चांगलाच गारवा असतो. यातून मध्यंतरी या भागात पारंपरिक स्ट्रॉबेरीच्या शेतीसोबतच शेतकऱ्यांनी केशर पिकाचंही उत्पादन घ्यायला सुरुवात केली. केशर लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर येथील शेतकऱ्यांनी सफरचंद लावायचं ठरवली, ज्यालाही चांगली फळं आली आहेत.

तीन वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशातून सफरचंदाची ६०० झाडं पाचगणी भागात आणण्यात आली. यानंतर सफरचंदाच्या झाडाला मोठं करण्यासाठी लागणारी सर्व काळजी या शेतकऱ्यांनी घेतली. या मेहनतीचं फळ त्यांना ३ वर्षांनी मिळत आहे. फळधारणा झाल्यानंतर तयार झालेली ही सफरचंद आता शेतकरी स्थानिक बाजारपेठेत विकायला आणणार आहेत. त्यामुळे हवामानाचा विचार करुन सफरचंद लागवडीचा धाडसी प्रयोग केलेल्या या शेतकऱ्यांचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT