ट्रॅक्टर रॅलीनंतर आज दिल्लीतली स्थिती काय?
दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला आलेलं हिंसक वळण आणि लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकावल्याच्या घटना गृह मंत्रालयाने गंभारपणे घेतल्या आहेत. त्यामुळे आज गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या निवासस्थानी आपत्कालीक बैठक बोलावून राजधानीमध्ये अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार सर्व संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दलाला तैनात करण्यात आली आहे. शिवाय गृहमंत्री […]
ADVERTISEMENT
दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला आलेलं हिंसक वळण आणि लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकावल्याच्या घटना गृह मंत्रालयाने गंभारपणे घेतल्या आहेत. त्यामुळे आज गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या निवासस्थानी आपत्कालीक बैठक बोलावून राजधानीमध्ये अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्याच्या सूचना केल्या आहेत.
ADVERTISEMENT
त्यानुसार सर्व संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दलाला तैनात करण्यात आली आहे. शिवाय गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाल्याचीही माहिती आहे. बैठकीत दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेची चाचपणी करण्यात आली आहे. गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिल्या. महत्त्वाचं म्हणजे हिसांचारासाठी व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत.
हे वाचलं का?
सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आंदोलकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जातोय. लाल किल्ला, नांगलोई, मुकरबा चौक आणि सेंट्रल दिल्लीतले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. शिवाय ठरलेल्या मार्गांहून वेगळ्या मार्गांवर जाण्यासाठी शेतक-यांना भडकवणा-यांचाही तपास पोलिसांकडून केला जातोय. दुपारी दिल्ली पोलिसांकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे, त्यातही आणखी महत्त्वाचे खुलासे ते करण्याची शक्यता आहे. दिल्ली क्राईम ब्रांच यासंबंधी तपास करत आहे. 22 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
राजधानीतील सर्व संवेदनशील स्थानांवर अतिरिक्त पॅरामिल्रिटी फोर्सेस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचीही सांगितलं जातं आहे. मंगळवारी रात्री उशिरा लाल किल्ल्याचा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला.
ADVERTISEMENT
प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारानंतर आज दिल्लीतली स्थिती काय?, हा व्हिडिओ पाहा..
ADVERTISEMENT
पोलिसांनी आयटीओहून पुढे जाणारा दीन दयाल उपाध्यय मार्ग बंद केला आहे. शिवाय आयटीओहून इंडिया गेटकडे जाणारा मार्गही अद्याप बंदच आहे. मिंटो रोडवरून कनॉट प्लेसला जाणारा मार्गही बंद आहे. तर अन्य काही मार्ग मात्र सकाळी खुले करण्यात आले.काही आंदोलकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला, काहींनी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. आत्तापर्यंत 300 पोलीस जखमी झाल्याचं वृत्त असून, जखमी पोलिसांमधील 45 जणांना ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आल्याचंही कळतंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT