पालघरमध्ये दोन तरुणांना लुबाडलं : आर्यन खानला पकडून आणलेल्या किरण गोसावीवर गुन्हा दाखल
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला NCB ने अटक केल्यानंतर NCB ऑफीसमध्ये त्याच्यासोबत सेल्फी काढणारा किरण गोसावी हा चर्चेत आला आहे. NCB ने किरण गोसावी या आपला साक्षीदार असल्याचं सांगितलं. परंतू यानंतर किरण गोसावीने तरुणांना परदेशात नोकरी देतो असं सांगून लाखो रुपयांना गंडा घातल्याचं समोर आलं. यापैकी पालघरच्या एढवन येथील दोन तरुणांना दीड लाखांना […]
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला NCB ने अटक केल्यानंतर NCB ऑफीसमध्ये त्याच्यासोबत सेल्फी काढणारा किरण गोसावी हा चर्चेत आला आहे. NCB ने किरण गोसावी या आपला साक्षीदार असल्याचं सांगितलं. परंतू यानंतर किरण गोसावीने तरुणांना परदेशात नोकरी देतो असं सांगून लाखो रुपयांना गंडा घातल्याचं समोर आलं.
ADVERTISEMENT
यापैकी पालघरच्या एढवन येथील दोन तरुणांना दीड लाखांना लुबाडल्याप्रकरणी किरण गोसावीविरुद्ध केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना किरण गोसावीने परदेशात कामासाठी पाठवतो असं सांगून दीड लाख रुपये उकळले होते. यानंतर फरार झालेला किरण गोसावी थेट आर्यन खानला पकडून आणल्यानंतर NCB कार्यालयात दिसल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. पुण्यातील एका तरुणालाही किरण गोसावीने अशाच पद्धतीने गंडा घालून नंतर धमकी दिल्याचं समोर आलं होतं.
हे वाचलं का?
पालघर तालुक्यातील एडवन या गावातील दोन तरुणांचीही किरण गोसावीने दोन वर्षापूर्वी फसवणूक केली होती. उत्कर्ष तरे व आदर्श किनी या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो, असं सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती.
नवी मुंबई येथील कार्यालयातून तो हे रॅकेट चालवत होता. फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर उत्कर्ष व आदर्श याला मलेशियाला कामाला लावतो, असं सांगितल्यानंतर दोघांनीही गोसावीच्या बँक खात्यात पैसे जमा केले. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचं तिकीट व व्हिसा दिला. कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचं तिकीट व व्हिसा बोगस असल्याचं उघड झालं.
ADVERTISEMENT
त्या दोघांनाही शॉक बसला. इथून ते पुन्हा पालघर येथे आले. घरी परतल्यानंतर ते फसवणूक केल्याप्रकरणी केळवा पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांची फिर्याद घेतली नाही. दोघांनीही तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर दोन वर्षे उलटूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे उत्कर्ष यानं मुंबई तकशी बोलताना सांगितलं होतं. परंतू किरण गोसावीचे खरे कारनामे समोर आल्यानंतर आता पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT