Pune : बसच्या गोडाऊनला भीषण आग, दोन ट्रॅवल्स बस जळून खाक

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

पुण्याच्या उत्तमनगर भागातील कोपरे गावात शनिवारी रात्री साडेअकरा वाजल्याच्या दरम्यान एक भीषण घटना घडली. कोपरे गावातील एका बसच्या गोडाउनला भीषण आग लागली. या आगीत दोन ट्रॅवल्स बस जळून खाक झाल्या असून या गोडाऊनमध्ये काम करणारे दोन सख्खे भाऊ या आगीत जखमी झाले आहेत.

ADVERTISEMENT

जखमींवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार होत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोडाउनमध्ये बसची दुरुस्ती आणि पेंटींगचं काम चालायचं. काल रात्री इथे अचानक आग लागली आणि ती दोन-तीन बसपर्यंत पसरली. आगीने भीषण रुप घेतल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने या गोडाउनमधील बस सुरक्षित स्थळी आणण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांनी घटनास्थळी दाखल होत रात्री २ वाजेपर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT